शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

‘एज्युकेशन इको सिस्टीम’ची गरज

By admin | Updated: April 10, 2015 00:33 IST

सिद्धार्थ मुकोपाध्याय : 'डीकेटीई'च्या टेक्स्टाईल अ‍ॅण्ड इंजिनिअरिंंग इन्स्टिट्यूटच्या 'इलेक्ट्रॉनिक्स'चा रौप्यमहोत्सव

इचलकरंजी : शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहात ‘एज्युकेशन इको सिस्टीम’ची गरज आहे. जागतिक पातळीवर बदलत जाणाऱ्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांना टिकायचे असेल, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या स्पर्धेत सहभाग घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आयआयटी खरगपूरचे प्रा. डॉ. सिद्धार्थ मुकोपाध्याय यांनी केले.येथील ‘डीकेटीई’च्या टेक्स्टाईल अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक कल्लाप्पाण्णा आवाडे होते.‘डीकेटीई’च्या इलेक्ट्रॉनिक्स विभाग आणि आयईईई स्टुडंटस् चाप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्पिटींग’ या विषयावरील दिवसभर सुरू असलेल्या परिसंवादात आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक तज्ज्ञांचा सहभाग होता. श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात आयोजित या परिसंवादाची सुरुवात प्राचार्य डॉ. पी. व्ही. कडोले यांच्या भाषणाने झाली. त्यांनी डीकेटीई व इलेक्ट्रॉनिक्स विभाग यांचा आढावा घेतला. उपप्राचार्या डॉ. एल. एस. आडमुठे यांनी कार्यशाळेबाबत माहिती दिली.आवाडे यांनी सन १९८० मधील इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या सुरुवातीच्या काळामधील आठवणी सांगितल्या. परिसंवादातील आपल्या प्रमुख भाषणात मुकोपाध्याय म्हणाले, केवळ ‘चॉक आणि टॉक’ ही शिक्षण पद्धती आता चालणार नाही. शिक्षणामध्ये लवचिकता आणण्याची गरज आहे. शिक्षणामध्ये पारदर्शीपणा पाहिजे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना जे हवे असेल, तर ते देण्याची आता आवश्यकता आहे. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्सुकता असेल, त्याबाबतचे सखोल ज्ञान त्यांना मिळाले पाहिजे. आपली गुणवत्ता जागतिक स्तरावर सिद्ध करायची असेल, तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणे ही आता काळाची गरज आहे. ज्यामुळे जागतिक पातळीवर सध्या नेमके काय चालू आहे, याची माहिती विद्यार्थ्यांना होत जाईल.यावेळी शिवाजी विद्यापीठाचे डॉ. सी. डी. लोखंडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रबंध आणि त्यांचे संशोधन जगासमोर आले पाहिजे. त्या प्रबंधांचे चांगल्या नियतकालिकामध्ये प्रसिद्धीकरण होणे आता गरजेचे आहे. ज्यामुळे आपल्याकडे तयार असलेल्या संशोधनाची गुणवत्ता निश्चितपणे सिद्ध होईल. यावेळी झेकोस्लेव्हियामधील संशोधक पवेल स्पेसक यांनी ‘डीकेटीई’च्या ‘अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल अ‍ॅप’ची सुरुवात केली. इलेक्ट्रॉनिक्स विभागातील व्ही. एल. एस. आय., सिग्नल प्रोसेसिंग, कम्युनिकेशन, इंटरडिस्पिलनिरी अँड कॉॅम्प्युटिंग या विषयावरील काही प्रबंध व कोरिया देशातील विद्यार्थ्यांचे संशोधन यावेळी सादर करण्यात आले.यावेळी मानद सचिव डॉ. सपना आवाडे, प्रा. आर. के. कामत, प्रा. ए. सी. बगली, प्रा. डी. बी. कुलकर्णी, आदी उपस्थित होते. प्रा. एस. डी. गोखले व प्रा. डी. एन. ढंग यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले. प्रा. ए. व्ही. शहा यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)