कोल्हापूर : खंडणीप्रकरणी किशोर माने, त्याचा भाऊ किरण माने यांच्यासह सहाजणांच्या ‘किशोर माकडवाला गँग’विरुद्ध कोल्हापूर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली. गोकुळ शिरगाव पोलिसांनी या टोळीविरोधात दाखल प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मंजुरी दिली. कामगार ठेकेदार जामिऊल अन्सरुल हक (वय ३९, रा. मूळ मुर्शिदाबाद, कोलकाता, सध्या रा. तामगाव, ता. करवीर) यांचे दि. २८ ऑगस्ट रोजी ‘किशोर माकडवाला गँग’च्या प्रमुखांनी ‘परराज्यांतून येऊन भरपूर पैसे कमवतोस, त्यामुळे तुला हप्ता द्यावा लागेल,’ असे सांगून त्यांना चाकूचा धाक दाखवून सोन्याची चेन, अंगठी, खिशातील पैसे असा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेऊन खंडणीची मागणी केली. त्यानंतर तक्रारीनुसार पोलिसांनी ‘किशोर माकडवाला गँग’च्या पाचजणांना दि. ४ ते ८ सप्टेंबरदरम्यान अटक केली. तसेच गुन्ह्यात वापरलेली स्काॅर्पिओ गाडी जप्त केली; तर किरण मानेचा पोलीस अद्याप शोध घेत आहेत. अटकेतील सर्व संशयित हे कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
खंडणीप्रकरणी सहाजणांना ‘मोक्का’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:52 IST