शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

साडेदहा हजार शेतकऱ्यांचे नुकसान

By admin | Updated: February 27, 2015 23:20 IST

वनविभागाकडून नाममात्र भरपाई : कागदपत्रांच्या पूर्ततेवरच होतोय खर्च, उस नुकसानीस प्रतिटन फक्त ४०० रुपये

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे, फळझाडांचे नुकसान झाल्यास वनविभागाकडून भरपाई दिली जाणारी भरपाई नाममात्र आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी होणाऱ्या खर्चापेक्षा भरपाई कमी मिळते. उसाचे नुकसान झाल्यास टनाला फक्त चारशे रुपये मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांवर ‘भीक नको; पण कुत्रं आवर’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. सन २००४ ते जानेवारी २०१५ अखेर कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पाच जिल्ह्यांतील पीक आणि फळझाडांचे १० हजार ६७२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. भरपाईपोटी ९ कोटी ५२ लाख ५३ हजार रुपये वनविभागाने दिले आहेत.हत्ती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी वनविभागाची अत्यल्प भरपाई २३ आॅगस्ट २००४ रोजी नाकारली. पाच जिल्ह्यांंतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली भरपाई वाढीसाठी वेळोवेळी निवेदने, आंदोलने, मोर्चा, उपोषण केले. याची दखल घेऊन शासनाने २००६, २०१३ मध्ये नुकसानभरपाईत अत्यल्प वाढ केली.हत्ती, रानगवे यांच्यापासून नुकसान झालेल्या नारळाच्या प्रतिझाडास दोन हजार, सुपारीस १२०० रुपये, कलमी आंब्यास १६०० रुपये, केळीस ४८ रुपये भरपाईचा दर आहे. हत्ती, रानडुक्कर, हरीण, रानगवा, नीलगाय, माकड यांच्यापासून पिकांचे २ हजार ते १० हजारांपर्यंत नुकसान झाल्यास कमीत कमी ५०० पासून ६ हजार, तर १० हजारांपेक्षा अधिक नुकसान झाल्यास सहा हजार ते १५ हजार रुपये भरपाई दिली जाते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गाय, म्हैस, बैलाचा मृत्यू झाल्यास अधिकाधिक दहा हजार, मेंढी, बकरी यांचा मृत्यू झाल्यास अधिकाधिक तीन हजार भरपाई देण्याची तरतूद आहे. जखमी प्रती जनावरास फक्त एक हजार रुपये दिले जातात. बाजारातील जनावराची किंमत आणि वनविभागाकडून दिल्या जाणाऱ्या सध्याच्या भरपाईमध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भुर्दंड सोसावा लागत आहे. वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, हत्ती, मगर, रानकुत्र्यांच्या हल्ल्यात व्यक्ती मृत झाल्यास वारसांना पाच लाख, कायमचे व्यंगत्व आल्यास चार लाख, गंभीर जखमी झाल्यास दहा हजार रुपये दिले जातात. (समाप्त)नारळासाठी फक्त ७ रुपये प्रजननादरम्यान गिधाड नारळाच्या झाडावर घरटे बांधते. त्याच्या विष्ठेने नारळाचे उत्पन्न घटते. नुकसानग्रस्तास प्रतिनारळास केवळ सात रुपये नुकसानभरपाई दिली जाते. ही रक्कम मिळण्यासाठीही गिधाडांच्या विणीचा हंगाम संपेपर्यंत शेतकऱ्यांनी घरट्यांचे संरक्षण करण्याची जाचक अटही त्यात आहे. नुकसानीची प्रकरणे अन् भरपाईपाच जिल्ह्यांत वर्षनिहाय झालेली नुकसानीची प्रकरणे आणि कंसात मिळालेली भरपाई अशी : २००४-०५ : ९ (२४ लाख), २००५-०६ : ५४४ (२१ लाख ९८ हजार), २००६-०७ : १४०९ (१ कोटी ५८ लाख ७६ हजार), २००७-०८ : १७९९ (१ कोटी ५७ लाख ४४ हजार), २००८-०९ : २४२२ (२ कोटी १८ लाख ९६ हजार), २००९-१० : ३७३ (८ लाख ५७ हजार), २०१०-११ : १२३८ (१ कोटी ३० लाख ८८९), २०११-१२ : ९५८ (७२ लाख १७२), २०१२-१३ : ९९८ (८६ लाख ८३ हजार), २०१३-१४ : ९६ हजार २१ हजार.