शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

ठरलं बघा... नक्की बघा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:31 IST

विश्वास पाटील मी त्या वेळेला न्यू कॉलेजमध्ये एस. वाय. बी. कॉम. मध्ये होतो. मंगळवार पेठेत भाड्याने खोली घेऊन राहात ...

विश्वास पाटीलमी त्या वेळेला न्यू कॉलेजमध्ये एस. वाय. बी. कॉम. मध्ये होतो. मंगळवार पेठेत भाड्याने खोली घेऊन राहात होतो; परंतु आम्ही गावात त्यावेळी शेका पक्षाचे कट्टर कार्यकर्ते होतो. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून १९८९च्या निवडणुकीत शेका पक्षातर्फे गोविंदराव कलिकते यांनी काँग्रेसचे खासदार उदयसिंहराव गायकवाड यांना कडवे आव्हान दिले होते. गायकवाड यांच्याबद्दल त्या निवडणुकीत मतदारांत प्रचंड नाराजी होती. त्यामुळे पूर्ण मतदारसंघात कलिकते यांची हवा तयार झाली होती. त्यांचे खटारा (गाडी) हे चिन्ह होते. प्लास्टिकची लाल गाडी खिशाला लावून तरुण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर प्रचारात उतरले होते.कलिकते यांची प्रचारात हवा करण्याची हातोटी होती. त्यावेळी आचारसंहितेचा बडगा नव्हता. त्यामुळे खर्चावर बंधन नव्हते. कलिकते १९८५ला जिल्ह्यातील मातब्बर नेते श्रीपतराव बोंद्रे यांचा पराभव करून सांगरूळ विधानसभा मतदार संघातून विजयी झाल्याने ते ‘जायंट किलर’ ठरले होते. त्यामुळेही त्यांच्या नेतृत्वाबद्दल मतदारसंघात क्रेझ होती. त्यावेळी भोगावती कारखान्याची सत्ताही त्यांच्याकडेच होती. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे शेका पक्षाच्या हाडाच्या कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या पाठीशी होती. त्या बळावर त्यांनी या मैदानात शड्डू ठोकला होता.बिंदू चौकात एक भला मोठा फलक लावला होता. त्यावर गायकवाड यांचा उल्लेख ‘मौनी बाबा’ असा केला होता. कोल्हापूर शहरातूनच कलिकते यांना जास्त प्रतिसाद होता. कलिकते यांनी काढलेल्या प्रचारफेरीस प्रचंड प्रतिसाद होता. त्या फेरीत ‘गोंधळ’ हा सजीव देखावा होता. त्यातील गोंधळी ‘ठरलं बघा... नक्की बघा...!’ एवढंच म्हणायचा. लोक त्याला हात उंचावून प्रतिसाद द्यायचे. आता या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी ‘आमचं ठरलंय..’ ही कॅचलाईन फेमस केली, त्यावेळी ‘ठरलं बघा...’ ही कॅचलाईन लोकांच्या तोंडात होती. प्रचाराची सांगता करतेवेळी त्यांनी काढलेली मिरवणूक विरोधी उमेदवारास धडकी भरविणारी होती. त्यावेळी ट्रॅक्टर-ट्रॉलीतून प्रचार केला जाई. त्यांनी काढलेली ट्रॅक्टर रॅली एवढी मोठी होती की तिची सुरुवात बिंदू चौकात आणि शेवट पुईखडीला होता.या प्रचारात आलेल्या कार्यकर्त्यांना त्यावेळी भोगावती कारखान्याच्या संचालकांच्या घरांतून भाकरी व झुणका दिला जाई. कुरुकलीचे बळी यशवंत पाटील यांच्याकडे ही जबाबदारी असे. वातावरण एकदम चांगले होते. त्यामुळे सीट नक्की बसणार याचा आत्मविश्वास होता. त्यामुळे मी कलिकते यांचा मतमोजणी प्रतिनिधी होतो. साहेब निवडून आले तर गुलालाने कपडे रंगणार म्हणून आम्ही त्यावेळी जुनी कपडे घालून गेलो होतो. वातावरण चांगले होते; परंतु कागलला राजीव गांधी यांची सभा झाली व गडहिंग्लज मतदारसंघात समाजवाद्यांनी कलिकते यांना मदत केली नाही.त्यामुळे दोन्ही मतदारसंघात प्रत्येकी वीस हजारांचे लीड गायकवाड यांना मिळाले व त्याच मतांवर ते विजयी झाले. त्यांनाही आपण निवडून येणार याचा आत्मविश्वास नव्हता. पहाटे चार वाजता गुलाल अंगावर घेऊनच ते मतमोजणी केंद्रात आले.