शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

कोल्हापूरच्या नाट्यपरंपरेचे साक्षीदार ‘केशवराव भोसले’ शंभरीत

By admin | Updated: October 14, 2015 01:08 IST

नूतनीकरण पूर्ण : नव्या दिमाखात रसिकांच्या सेवेसाठी सज्ज; सौंदर्य आणखी खुलले

इंदुमती गणेश -- कोल्हापूर कोल्हापूरच्या संगीत-नाट्य परंपरा, राजर्षी शाहू महाराजांनी कलेला दिलेल्या राजाश्रयाचा आणि पुढील कित्येक पिढ्या आपल्या अस्तित्वाने या परंपरेचा देदीप्यमान इतिहास सांगणाऱ्या केशवराव भोसले नाट्यगृहाला आज, बुधवारी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. राज्य शासनाच्या १० कोटींच्या निधीतून कोल्हापूर महापालिकेने या वास्तूचे नूतनीकरण करून तिचे सौंदर्य अधिक खुलविले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या दिमाखात मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे. शाहू महाराजांच्या प्रोत्साहनामुळे संगीत आणि नाट्य या दोन्ही कलांनी कोल्हापूरचे सांस्कृतिक जीवन समृद्ध केले. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या युरोप दौऱ्यात कुस्ती आखाड्यांसोबतच अनेक नाट्यगृहेदेखील पाहिली होती. असे नाट्यगृह आपल्या संस्थानातही असावे, या इच्छेने त्यांनी तिकडून आल्यावर तातडीने नाट्यगृहाच्या आणि खासबाग मैदानाच्या उभारणीसाठी पावले उचलली. हे नाट्यगृह बांधण्यापूर्र्वी कोल्हापुरात लक्ष्मी प्रसाद, शिवाजी व श्री. मेंढे यांचे शनिवार थिएटर अशी तीन नाट्यगृहे चालू होती. त्याकाळी शाहू महाराजांच्या दरबारी असलेले आर्किटेक्ट दाजीराव विचारे यांनी या नाट्यगृहाची इमारत उभारली. जीवबा कृष्णाजी चव्हाण यांनी या वास्तूचा आराखडा तयार केला होता. युवराज राजाराम महाराज यांच्या हस्ते उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर केशवराव भोसले यांच्या ललितकलादर्शन कंपनीच्या ‘सौभद्र’ या नाटकाने व किर्लोस्कर कंपनीच्या ‘मानापमान’ नाटकाच्या प्रयोगांनी येथे तिसरी घंटा वाजली. ही वास्तू महापालिकेकडे वर्ग झाल्यानंतर तिच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. मात्र, वास्तूची बांधणीच इतकी मजबूत आहे की, त्यातील एक दगडही ढासळलेला नाही; पण नाट्यगृहाच्या दुर्दशेचा फेरा गतवर्षी संपला आणि काही काळासाठी काळवंडलेल्या या पडद्याला नवी झळाळी मिळाली आहे. नाट्यगृहाची वैशिष्ट्येत्याकाळी हे भारतातील एकमेव सर्वांत मोठे नाट्यगृह होते. याच्या बांधकामास ९ आॅक्टोबर १९१३ रोजी सुरुवात झाली. १४ आॅक्टोबर १९१५ रोजी ते पूर्ण झाले. पूर्वीच्या काळी माईक सिस्टीमसारखे तंत्रज्ञान विकसित झालेले नव्हते; त्यामुळे कलाकारांना मोठ्याने संवाद आणि गीते म्हणावी लागत असत. कलाकारांचा आवाज शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी रंगमंचाखाली विहीर बांधण्यात आली होती. त्यामुळे कलाकारांचा आवाज नाट्यगृहात घुमायचा, हे या नाट्यगृहाचे एक खास वैशिष्ट्य आहे. नामांतराचे कारणकोल्हापुरात जन्म झालेल्या केशवरावांनी वयाच्या चौथ्या वर्षी रंगभूमीवर पाऊल ठेवले. शारदा नाटकातील ‘मूर्तिमंत भीती उभी’ या पदाने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. अठराव्या वर्र्षी त्यांनी ‘ललितकलादर्श’ नाटक मंडळी स्थापन करून संगीत सौभद्र, संस्कृत भाषेतील ‘शाकुंतल’ अशी अनेक संगीत नाटके सादर केली. बालगंधर्व यांच्याबरोबर केलेल्या ‘संयुक्त मानापमान’च्या पहिल्या प्रयोगावेळी त्यांच्या लोकप्रियतेने कळस गाठला होता. केशवरावांच्या अल्पशा कारकिर्र्दीत त्यांना राजर्र्षी शाहूंनी मोलाचे सहकार्य केले. विशेष म्हणजे ते शाहू महाराजांचे अत्यंत लाडके कलावंत होते. म्हणून या नाट्यगृहाला ‘केशवराव भोसले नाट्यगृह’ असे नाव देण्यात आले. पहिले ओपन एअर थिएटरनाट्यगृहामागे बांधण्यात आलेल्या खासबाग मैदानात शाहू महाराजांनी त्याकाळी पहिले ओपन एअर थिएटर बांधून घेतले. त्यावेळी त्याचे नाव ‘पॅलेस एरिना’ होते. शाहू महाराजांच्या विनंतीवरूनच या थिएटरचे उद्घाटन केशवराव भोसलेंच्याच ‘मृच्छकटिक’ संगीत नाटकाच्या सादरीकरणाने झाले. त्याकाळी २५ हजार पुरुष आणि पाच हजार महिलांनी हे नाटक पाहिल्याचा उल्लेख त्या काळच्या वृत्तपत्रांत आहे. देशातील नाट्यक्षेत्रातील इतिहासात एवढ्या मोठ्या समूहाने पाहिलेले ते एकमेव नाटक होते.