आठ दिवसांपूर्वी कळंबा कारागृहात मोबाईल व इतर साहित्य सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. पोलीस यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे. सीसीटीव्ही फुटेज व मोबाईलचा डंप डाटा यांचा आधार घेऊन संशयितांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी कोल्हापूरसह शेजारच्या जिल्ह्यांतील सर्व संशयितांची चौकशी सुरू आहे. रेकार्डवरील अनेक गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली होती. यातून इचलकरंजी पोलिसांच्या हाती मोठी माहिती लागली आहे. या प्रकरणी काहीजणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत अद्याप पोलीस पोहोचलेले नाहीत. मात्र येत्या एक-दोन दिवसांत या प्रकरणाचा पर्दाफाश होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
कळंबा प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:26 IST