भारत शास्त्री - बाहुबली -देशातील प्रत्येक नागरिकाला भेसळविरहित व सुरक्षित अन्न मिळविण्याचा हक्क आहे. त्यानुसार कायद्यातील तरतुदीनुसार ग्राहकांचे आरोग्य आणि हित जपण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रशासनाने राज्यातील सहाही विभागांमध्ये ‘अन्न साक्षरता’ या महाअभियानाची योजना आखली असून, त्याची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे.‘अन्न साक्षरता’ अभियानामध्ये शाळा-महाविद्यालयांतील मुले, गृहिणी, ग्राहक, शासकीय योजनेतील अन्न संबंधित यंत्रणा राबविणारे अधिकारी, रस्त्यावरील अन्न विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांचा समावेश आहे. शासकीय योजनेतील व्यावसायिक जसे बचत गट, शालेय पोषण आहार, मिड डे मिल, आश्रम शाळा, शासकीय वसतिगृह याचा प्रामुख्याने समावेश आहे.याशिवाय प्रामुख्याने रस्त्यावरील अन्न विक्रेते, दुग्ध व दुग्ध व्यावसायिकांना प्रशिक्षण, ग्राहकांसाठी ग्राहक जागर, विद्यार्थ्यांसाठी अन्न सुरक्षा, विद्यार्थी साक्षरता अभियान व गृहिणींसाठी स्वच्छ व आरोग्यदायी स्वयंपाकघर अभियान राबविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.या अभियानासाठी प्रत्येक जिल्ह्यातील नामांकित शाळा, ग्राहक मंच, तालुक्याची ठिकाणे निवडून ठिकठिकाणी व्याख्यान, प्रबोधन व प्रात्यक्षिकांद्वारे नागरिकांना व व्यावसायिकांना अन्न साक्षर करण्यात येणार आहे.प्रत्येकवेळी कारवाईची भीती न दाखविता अन्न व्यावसायिकांना अन्न साक्षर करण्याची ही संकल्पना व्यावसायिकांसह ग्राहकांनाही दिलासा देणारी आहे. स्वच्छ आणि सुरक्षित अन्न ग्राहकांचा अधिकार आहे. याचा थेट संबंध आरोग्याशी आहे. त्यामुळे गृहिणींपासून लहान-मोठ्या व्यावसायिकांना स्वच्छतेचे महत्त्व सांगितले जाईल व प्रबोधनातून नागरिकांना ‘अन्न साक्षर’ केले जाईल.- एस. एम. देशमुख, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, कोल्हापूरवैशिष्ट्ये :- तीन टप्प्यांमध्ये योजना शाळकरी मुले, गृहिणी, अन्न व्यावसायिकांचा समावेशव्याख्यान, प्रबोधन, प्रात्यक्षिकांचे आयोजन
‘अन्न साक्षर’साठी पुढाकार
By admin | Updated: November 16, 2014 23:51 IST