शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

भारतीय खेडी देशाचा आत्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:04 IST

भारत पाटील भारतीय खेडी हा देशाचा आत्मा आहे आणि म्हणूनच ग्रामीण जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी खेडी स्वयंपूर्ण व्हावीत यासाठी ...

भारत पाटीलभारतीय खेडी हा देशाचा आत्मा आहे आणि म्हणूनच ग्रामीण जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी खेडी स्वयंपूर्ण व्हावीत यासाठी ग्रामीण जीवनाची पुनर्निर्मिती झाली पाहिजे. याबद्दल महात्मा गांधीजी खूप आग्रही होते. आपला भारत देश भविष्यात मोजक्या शहरांत सापडणार नाही तर तो खेड्यांतही सापडेल. म्हणून खेडी जोपर्यंत विकसित होणार नाहीत; तोपर्यंत देश बदलणार नाही. अलीकडे वाढते शहरीकरण आणि कमी होणारा ग्रामीण भाग हा सर्वांच्या चिंतेचा विषय बनला आहे. शासन व ग्रामीण लोकप्रतिनिधी यांचा हा नैतिक पराभव मानावा लागेल. शहरांची प्रमाणापेक्षा झालेली वाढ ही सूजच म्हणावी लागेल. शहरी विकास, जीवनशैली व शहरांचे आकर्षण हे ग्रामीण लोकांना सतत राहिले आहे. शिक्षण, व्यवसाय व रोजगाराच्या निमित्ताने खेड्यातील माणूस शहरांकडे स्थलांतर करीत आहे आणि यामुळे आपली खेडी ओस पडत चालली आहेत व शहरांची सूज मात्र बेसुमार वाढत आहे. आणि यामुळं दोन्ही ठिकाणी खूप गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. भारताच्या सर्वांगीण विकासामध्ये ग्रामीण विकास ही तातडीची व अत्यावश्यक गरज बनली आहे. आर्थिक वाढ हा जरी विकासातील महत्त्वाचा घटक असला तरी फक्त आर्थिक विकास झाला म्हणजे सर्वांगीण विकास झाला हे म्हणणे आता चुकीचे ठरले आहे आणि म्हणून ‘विकास ही एक विविधांगी सतत चालणारी प्रक्रिया आहे’ असं मानून सर्व अंगांचा विचार करून नियोजनपूर्वक कृती आराखडा तयार केला पाहिजे. यामध्ये आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व मानवी मूल्यमापनाच्या बाबतीत गुणवत्तापूर्ण बदल होतील, असे प्रभावी कार्यक्रम असावेत. भारतात पंजाब व केरळ या दोन राज्यांची सर्वांगीण विकासाची तुलना करायची झाली, तर पंजाब हे दरडोई उत्पन्नामध्ये केरळच्या पुढे प्रगतीवर आहे. परंतु साक्षरता, बाल मृत्यू दर, महिला शिक्षण व सक्षमीकरण, आरोग्य बालविकास, स्वच्छता यामध्ये केरळ पंजाबच्या खूप पुढे आहे. म्हणूनच भारतीय खेड्यांत आर्थिक वाढीबरोबरच सर्वांगीण व अंगभूत विकासाला महत्त्व दिले पाहिजे. आपल्या सर्व खेड्यांचा कृतिशील विकास आराखडा (ॠढऊढ) करायची वेळ आली आहे. कोणतेही राष्ट्र असो वा व्यक्ती त्याला स्वाभिमान, आत्मसन्मान व प्रतिष्ठा असतेच. याला समानता व स्वातंत्र्य यांची जोड असणंही खूप महत्त्वाचे आहे. आमचं गाव आम्हीच सरकार...आपला देश समृद्ध व सुंदर देश...ही भावना ग्रामीण भागातील प्रत्येकाच्या अंगी यायलाच हवी. यासाठी ग्रामीण भागातील सर्व लोकप्रतिनिधी व कर्मचारी यांची उंस्रंू्र३८ ु४्र’्िरल्लॅ अतिशय महत्त्वाची आहे. यासाठी नवीन अद्ययावत प्रशिक्षण त्यांना देणे ही काळाची गरज आहे. आपले अधिकार, कर्तव्य व जबाबदारी हे समजले तरंच कार्यात सुलभता येऊ शकते. गावाचा कारभार चालवताना अधिनियम, पारदर्शकता, अद्ययावत सुविधा, नेतृत्व गुण, आदर्श गाव संकल्पना, गाव कृती आराखडा, लोकसहभाग या बाबींसाठी प्रभावी प्रशिक्षण असायलाच पाहिजे. याशिवाय स्मार्ट व्हिलेज, मॉडेल गाव, आदर्श गाव हे घडू शकत नाही. म्हणून भविष्यातील आपला गाव उभा करत असताना गावातील सर्व घटकांना प्रबोधन व प्रशिक्षण देऊन ग्रामदूतांची फौज उभी करावी लागेल. त्यांनी जसं आर्मीमधील जवान सीमेवर देशाचे रक्षण करताना अहोरात्र डोळ्यात तेल घालून उभा असतो तसं आपणही आपली गावं विकसित करण्यासाठी ती प्रेरणा.. ती ऊर्जा व तो निर्धार अंगी घेऊन कार्य करण्याची वेळ आली आहे. शहरांतील सोयी-सुविधा व संधी जर खेड्यांत उपलब्ध झाल्या; तर ग्रामीण भागाकडून शहरांकडे जाणारे लोंढे आपोआप थोपवले जातील. शैक्षणिक पात्रता, रोजगार र‘्र’’ ीि५’ङ्मस्रेील्ल३ या बाबी आता गाव कृती आराखड्यात अंतर्भूत केल्या पाहिजेत. व्यापक दृष्टिकोन यावा यासाठी गावचे कारभारी आता सक्षम झालेच पाहिजेत. ‘जे जे गावी शहाणे झाले ! शक्ती युक्तीनी पुढे निघाले ’’(लेखक ग्रामविकास व व्यसनमुक्ती चळवळीतील बिनीचे कार्यकर्ते आहेत)