शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
4
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
6
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
7
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
8
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
9
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
10
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
11
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
12
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
13
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
14
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
15
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
16
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
18
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
19
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
20
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी

इचलकरंजी पोलीस दलाची नामुष्की

By admin | Updated: March 31, 2015 00:28 IST

चोऱ्या, घरफोड्यांसह दरोडेही : गस्ती पथकासह गुन्हे शोध पथक निष्क्रिय, अनेक प्रकरणांचा तपास रखडला

अतुल आंबी- इचलकरंजी - येथील दिवसाढवळ्या होणाऱ्या चोऱ्या, रात्रीच्या घरफोड्या यांसह दोन दिवसांपूर्वी भरचौकात पडलेला साडेचार कोटींचा दरोडा यामुळे इचलकरंजीतील पोलीस दलांची चांगलीच नामुष्की झाली आहे. शहरात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी नेमके करतात तरी काय? असा सवाल या निमित्ताने नागरिक उपस्थित करीत आहेत.पोलीस अधिकाऱ्यांची इचलकरंजीला नियुक्ती म्हणजे ‘चांगले’ पोलीस स्टेशन अशी ओळख जिल्हा पोलीस दलात होती. कारण शहरातील वस्त्रोद्योगाची आर्थिक उलाढाल मोठी असल्याने पोलिसांची पाचही बोटे तुपात, अशी परिस्थिती होती. येथील वस्त्रोद्योग व्यवसायामुळे देशातील अनेक राज्यांतून लोक येऊन राहिले आहेत. त्यामध्ये कामगारवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. औद्योगिकीकरणामुळे येथील प्रगती झाली असली तरी त्याबरोबर अवैध व्यवसायही वाढत गेले. शहरात खंडणी, खून, मारामाऱ्या यासह मटका, जुगार, गावठी दारू यासारखे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात पसरले होते. इचलकरंजी शहरात अतिरिक्त पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस उपअधीक्षक कार्यालय यासह दोन पोलीस स्टेशन, एक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक असे सुमारे २५० पोलीस कार्यरत असतानाही तत्कालीन पोलिसांना या अवैध व्यवसायाला पसरण्यापासून थांबवणे अथवा त्यावर जरब बसविणे म्हणावे तसे कोणाला जमले नाही. दीड वर्षांपूर्वी एस. चैतन्य हे आयपीएस अधिकारी याठिकाणी सहायक पोलीस अधीक्षक म्हणून रूजू झाले. योगायोगाने त्यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयाचा पदभार रिक्त होता. त्यामुळे पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण जबाबदारी चैतन्य यांनी घेतली. कोणाचाही हस्तक्षेप होत नसल्याने कारवाईचा धडाका लावत कोणतीही तडजोड न करता येथील अवैध व्यवसाय ९० टक्के गुंडाळला. शहराच्या इतिहासातील हा पहिलाच यशस्वी प्रयत्न होता. येथील कामगारवर्गामुळे ९० टक्केसुद्धा अवैध व्यवसाय बंद करणे सहजासहजी शक्य नव्हते. मात्र, आयपीएस अधिकारी असल्याने गुंडांसह त्यांना पाठबळ देणाऱ्या व्हाईट कॉलर लोकांवरही त्यांची जरब बसली आणि बघता-बघता मटका, जुगार, गावठी दारू यासह खंडणीसारखे प्रकार कमी झाले. (पूर्वार्ध)अनेक मोठ्या प्रकरणांचा तपास नाहीशहरातील कित्येक मोठे गुन्हे उघडकीस आले नाहीत. कृष्णकुंज बंगल्यावर पडलेला दरोडा, वाटमारी करून कोयत्याचा धाक दाखवून लुटून नेलेले लाखो रुपये यासह कित्येक सर्वसामान्यांच्या घरात झालेल्या घरफोड्या, दिवसाढवळ्या महिलांच्या गळ्यातून धूम स्टाईलने चोरलेले दागिने अशा अनेक प्रकरणांचा तपास रखडला आहे. अच्छे दिन कधी येणार?भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर नागरिकांच्या आशाही वाढल्या आहेत. सर्वच सरकारी क्षेत्रात बदल होतील, असे वाटत आहे. याचा परिणाम पोलीस दलावर कधी होणार?, पोलिसांच्या यंत्रणेत सुधारणा होऊन अच्छे दिन कधी येणार?, असे प्रश्न सामान्य नागरिकांतून उपस्थित होत आहेत.