शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

बेरजेच्या राजकारणामुळेच नरकेंची बाजी

By admin | Updated: October 22, 2014 00:24 IST

तडजोडीचे राजकारण न करता कार्यकर्त्यांचा पोकळ आत्मविश्वास पी. एन. पाटील यांना नडला आहे

राजाराम लोंढे - कोल्हापूर -मतदारसंघातील घरोघरी ठेवलेला थेट संपर्क, केलेल्या विकासकामांमुळेच आमदार चंद्रदीप नरके यांचा विजय सुकर झाला, तर निवडणुकीच्या तोंडावर अंगावर घेतलेली राष्ट्रवादी, तडजोडीचे राजकारण न करता कार्यकर्त्यांचा पोकळ आत्मविश्वास पी. एन. पाटील यांना नडला आहे, असेच करवीर मतदारसंघातील निकालाचे विश्लेषण करावे लागेल. दोघांतच काटा लढत असल्याचे लक्षात आल्यानंतर ‘जनसुराज्य’चे राजू सूर्यवंशी व ‘भाजप’चे के. एस. चौगले यांना मतदारांनीच स्पर्धेतून बाजूला केले. कुंभी कासारी साखर कारखान्याच्या माध्यमातून चंद्रदीप नरके यांचा या ना त्या मार्गाने संपर्क कायम राहिला. जनतेच्या सुख-दु:खात थेट सहभागी होत असल्याने त्यांच्याबद्दल सामान्य माणसात कमालीची सहानुभूती होती. मतदारसंघातील काही ठरावीक गावे सोडली तर त्यांच्याकडे फारसे ताकदीचे नेतेही नाहीत; पण थेट कार्यकर्त्यांसह जनतेशी असलेल्या संपर्काच्या बळावर त्यांनी मुसंडी मारली.विरोधी आमदार असतानाही त्यांनी केलेली विकासकामे निश्चितच विचार करायला लावणारी आहेत. मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांबाबत विधानसभेत आवाज उठवून तो पद्धतशीर जनतेपर्यंत पोहोचविला. टोलच्या आंदोलनात आक्रमक घेतलेली भूमिकाही निवडणुकीत निर्णायक ठरली. संपर्क व विकासकामे बरोबर घेत त्यांनी प्रचाराचे नेटके नियोजन केले होते. आमदार नरके यांचे बंधू अजित नरके गगनबावड्यात, तर काका अरुण नरके पन्हाळ्यात तळ ठोकून होते. आमदार नरके यांनी आपल्या शिलेदारांना घेऊन करवीरच्या गडाला मोठे भगदाड पडणार नाही, याची खबरदारी घेतली.गेल्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या साडेपाच हजारांनी चंद्रदीप नरके विजयी झाले होते. पी. एन. पाटील यांच्यासारख्या तगड्या विरोधकाला टक्कर देणे सोपे नव्हते, याची जाणीव आ. नरके यांना होती. या निवडणुकीची तयारी पाटील यांनी गेल्या दोन वर्षांपासून सुरू केल्याने नरके यांना अंदाज आला होता. त्यामुळे तडजोडीचे धोरण स्वीकारत त्यांनी एक एक फासे टाकण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर संधान साधून त्यांना आपल्याकडे वळविण्यात यश मिळविले. गत विधानसभा निवडणुकीत नरके गगनबावडा तालुक्यात तब्बल साडेतीन हजार मतांनी पिछाडीवर होते. या तालुक्यात यावेळी मताधिक्य घेण्यासाठी जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे यांच्याबरोबर तडजोड करून नरके यांनी दुसरी खेळी यशस्वी केली.ही निवडणूक म्हणजे काठावरची लढत असल्याचे लक्षात आल्यानंतर नरके यांनी अंतर्गत तडजोडी सुरू केल्या; पण करवीरमध्ये त्यांच्या हाताला फारसे लागत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपले लक्ष पन्हाळ्यावर केंद्रित केले. त्यामुळेच पन्हाळ्यातून तब्बल चौदा हजारांचे मताधिक्य नरके यांना मिळाले. पी. जी. शिंदे अडीच हजारांचे मताधिक्य घेऊनच आल्याने पन्हाळा-बावड्यातून चंद्रदीप नरके यांना साडेसोळा हजारांचे मताधिक्य करवीरमध्ये मिळाले. जुन्या करवीरमध्ये त्यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नसल्याने त्यांना काठावरचा विजय मिळाला.पी. एन. पाटील यांनी आक्रमक प्रचार यंत्रणा राबविली. गल्लोगल्ली प्रचार करून वातावरण निर्मिती केली होती. त्यातच जुन्या करवीर व सांगरूळमध्ये पाटील यांच्याबाबत सहानुभूतीची एक सुप्त लाट होती. त्याचा फायदा नरके यांचे मताधिक्य कमी करण्यात झाला. पी. एन. पाटील यांच्या तीन वेळा झालेल्या पराभवामुळे कॉँग्रेस कार्यकर्ते पेटून उठले होते. विशेषत: तरुण वर्गाचा पाठिंबा त्यांना मिळाला होता; पण पन्हाळा व गगनबावडा तालुक्यांकडे त्यांनी फारसे गांभीर्याने पाहिले नसल्याने त्याचा फटका पाटील यांना बसला.मार्केटिंगच पथ्यावर !मतदारसंघात लहानातील लहान जरी विकासकाम केले, तरी त्याच्या प्रसिद्धीचे नियोजन आमदार नरके यांचे नेटके होते. त्याचे डिजिटल लावून त्याचे मार्केटिंग करण्यात ते पुढे होते. विरोधकांनी जरी त्यांच्यावर याबाबत टीका केली असली, तरी हेच मार्केटिंग त्यांच्या पथ्यावर पडले.‘संपर्का’भोवतीच फिरली निवडणूक संपर्काशिवाय पी. एन. पाटील यांच्याविरोधात बोलण्यास एकही मुद्दा नरके यांच्याकडे नव्हता. त्यामुळे पाटील यांनी विकासकामे व पक्षनिष्ठेचा मुद्दा अगदी ताकदीने प्रचारात आणला, तर नरके यांनी पाटील यांच्या संपर्कावरच बोट ठेवून आक्रमक प्रचार केला.बेरजेच्या राजकारणात अपयशगतवेळी साडेपाच हजार मतांनी पराभव झाल्यानंतर पी. एन. पाटील यांनी जुन्या करवीरसह पन्हाळ्यात कॉँग्रेसचे गट निर्माण केले. काठावरील लढाई असल्याने काही मोठ्या तडजोडी करून बेरजेचे राजकारण करणे गरजेचे होते. पाटील यांनी काही ठिकाणी प्रयत्नही केले; पण त्यामध्ये ते फारसे यशस्वी झाले नाहीत.‘कुंभी’ अलिप्त!करवीरच्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा कुंभी-कासारी साखर कारखाना आहे. गेल्या निवडणुकीत प्रचाराचे केंद्रबिंदू ‘कुंभी’ कारखानाच होता; पण या निवडणुकीत कुंभी प्रचारापासून अलिप्त राहिला.पराभवाची कारणेविद्यमान आमदारांबद्दलची काही प्रमाणात निर्माण झालेली नाराजीजुन्या करवीर- मध्ये पी. एन. पाटील यांनी केलेले पॅचवर्ककुंभी-कासारी यंत्रणा गेल्या वेळच्या तुलनेत आक्रमक झाली नाहीजुन्या सांगरूळ- मध्ये ताकद निर्माण करण्यात अपयश