निवास वरपे ल्ल म्हालसवडेसंपावर गेलेल्या राज्यातील राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटने(मॅग्मो)च्या कोल्हापूर जिल्ह्यातील ३२५ डॉक्टरांनी आज, रविवारी सहाव्या दिवशीही कामावर हजर राहण्यास नकार दिला. डॉक्टरांच्या संपामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. ऐन जुलै महिन्यात पाऊसच नाही. त्यातच कडाक्याचे ऊन व कोंदट वातावरण यामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत.दरवर्षी पावसाळ््याच्या सुरुवातीलाच आरोग्य खात्यामार्फत दक्षतेच्या सूचना व उपाययोजना आखल्या जायच्या. पावसाळ््यामध्ये होणाऱ्या संभाव्य साथींना तोंड देण्यास आरोग्य यंत्रणा सक्रिय असायची. वैद्यकीय अधिकारी व त्यांचे कर्मचारी घरोघरी जाऊन रुग्णांची विचारपूस करायचे; पण यावर्षी अद्याप दमदार पावसास सुरुवातच नाही. त्यातच कोल्हापूर जिल्ह्यातील ३२५ शासकीय अधिकारी गेले सहा दिवस संपावर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात १६ ग्रामीण रुग्णालये, दोन उपजिल्हा रुग्णालये व ७३ प्राथमिक आरोग्य केंद्रे अशी शासकीय आरोग्य सेवा आहे. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची भरमसाट फी व विनाकारण होणारा आर्थिक भुर्दंड सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेरील आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक गेले सहा दिवस डॉक्टरांचा संप मिटावा या प्रतीक्षेत आहेत.
आरोग्य यंत्रणा पुरती कोलमडली
By admin | Updated: July 7, 2014 00:48 IST