शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गोवा, कर्नाटकच्या धर्तीवर अनुदान द्या

By admin | Updated: December 7, 2015 00:42 IST

उत्पादक शेतकऱ्यांची मागणी : ‘गोकुळ’च्या दरकपातीमुळे झटका

कोल्हापूर : गायीचे दूध अतिरक्त झाल्याने ‘गोकुळ’च्या दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांची कपात करण्यात आली आहे. याचा उत्पादकांना चांगलाच झटका बसला आहे. अगोदरच दूध व्यवसाय शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. पशुखाद्य व वैरणीचे वाढलेले दर व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दूध संघाने दिलेला झटका उत्पादकांना सोसणारा नाही. यासाठी गोवा व कर्नाटक सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने गायीच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये थेट उत्पादकांच्या नावावर अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे. साखरेचे कोसळलेले दर व त्यातून साखर व्यवसायासमोर निर्माण झालेली अनिश्चितता, अशा परिस्थितीत ग्रामीण अर्थव्यवस्था सांभाळण्याचे काम दूध व्यवसाय करीत आहे. दहा दिवसाला दुधाचे पैसे हातात येत असल्याने संसाराचा गाडा पुढे हाकण्यास मदत होते. दहा-पंधरा वर्षांपूर्वी म्हैस दुधाच्या तुलनेत गायीचे दूध फारच कमी होते. गायीच्या दुधाला दर कमी मिळत असल्याने शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करीत होता. मात्र, अलीकडील काळात म्हैशीच्या दुधाची मागणी वाढल्याने दूध पावडरसाठी गायीचे दूध मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ लागले. त्यामुळे गायीच्या दूध दरात वाढ होत गेली. गेल्या वर्षभरात स्थानिक बाजारपेठेसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरीचे दर घसरल्याने दूध संघांपुढे पेच निर्माण झाला आहे. मध्यंतरी काही दूध संघांनी गायीचे दूध स्वीकारण्यास नकार दिला होता. ‘गोकुळ’ या दूध संघाकडे सध्या १२ लाख ३२ हजार लिटर दूधाचे संकलन होते. त्यापैकी ५ लाख ५१ हजार लिटर गायीचे दूध आहे. ‘गोकुळ’ ला रोज दोन लाख लिटर दुधाची पावडर करावी लागते. सध्या बाजारात १४० ते १४५ रुपये असा दूध पावडरीचा दर आहे. गायीच्या दुधाला प्रति लिटर २३ रुपये ५० पैसे उत्पादकांना द्यावे लागतात. उत्पादकांना द्यावयाचा दर व पावडरचे दर पाहता मोठा तोटा सहन करावा लागत आहे. यासाठी गायीचा दूध दर दोन रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूध संघाच्या अर्थकारणाच्या दृष्टीने कदाचित हा निर्णय योग्य असेल; पण उत्पादकांचा विचार कोण करणार? हा प्रश्न आहे. पशुखाद्याचे दर, दुष्काळाची पार्श्वभूमी यामुळे हा व्यवसाय अडचणीत असताना दुधाचे दर कमी केल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. गोवा राज्यात गायीच्या दूधाला राज्य सरकार थेट प्रतिलिटर सात रुपये अनुदान, तर कर्नाटकात चार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करते. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही गायीच्या दुधाला अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे. मुळात दूध व्यवसाय अडचणीत आला असताना ‘गोकुळ’ने दर कपातीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना झटका दिला आहे. तोट्याचे कारण सांगून दर कमी करण्यासारखी सध्याची परिस्थिती नाही. - भरत वातकर, दूध उत्पादक, सांगरूळगायीचे दूध वाढले आहे. त्यात दूध पावडरला दर नसल्याने संघाचा मोठ्या प्रमाणात तोटा होत आहे. संघाची आर्थिक घडी विस्कटू नये, यासाठी संचालक मंडळाला हा निर्णय घ्यावा लागला. - अरुण नरके, ज्येष्ठ संचालक, गोकुळ दूध संघ