शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
4
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
5
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
6
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
7
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
8
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
9
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
10
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
11
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
12
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
13
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
15
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
16
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
17
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
18
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
19
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
20
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव

सेरी टुरिझममुळे रेशीम शेतीला चांगले दिवस --डॉ. ए. डी. जाधव -संडे स्पेशल मुलाखत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 01:25 IST

टसर रेशीम विकास कार्यक्रमासह सेरी टुरिझम ही संकल्पना राबविण्याचे आपले धोरण आहे. रेशीम शेतीतून उत्पादन वाढवून कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू यांच्या पुढेही महाराष्ट्राला नेऊन ठेवण्याचे स्वप्न आहे. माझा या क्षेत्रातील ३३ वर्षांचा अनुभव पणाला

ठळक मुद्दे चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद == राज्य रेशीम सल्लागार समिती तज्ज्ञ सदस्य

नसिम सनदी ।

 

टसर रेशीम विकास कार्यक्रमासह सेरी टुरिझम ही संकल्पना राबविण्याचे आपले धोरण आहे. रेशीम शेतीतून उत्पादन वाढवून कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू यांच्या पुढेही महाराष्ट्राला नेऊन ठेवण्याचे स्वप्न आहे. माझा या क्षेत्रातील ३३ वर्षांचा अनुभव पणाला लावून रेशीम शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून दिला जाणार आहे.

- डॉ. ए. डी. जाधवपावसाचा लहरीपणाच्या काळातही शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून रेशीम शेतीकडे पाहिले जाते. यात सुधारणेसाठी अजूनही खूप वाव असल्याने याचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे पहिल्यांदाच रेशीम सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. अतुल पाटणे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या समितीमध्ये शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाचे डॉ. ए. डी. जाधव यांची तज्ज्ञ सदस्य म्हणून निवड झाली आहे. या निमित्ताने डॉ. ए. डी. जाधव यांच्याशी साधलेला थेट संवाद.

प्रश्न: रेशीम शेतीवरच लक्ष केंद्रित करावे असे का वाटले?उत्तर : संलग्न व्यवसायाची जोड दिली तरच शेती परवडते. रेशीम शेती हा असा उद्योग आहे की, दर महिन्याला ताजा पैसा मिळवून देतो. तुम्ही जितके कष्ट करता, जितकी शास्त्रीय पद्धत वापरता, तितका परतावाही मिळतो. शेतकरी आत्महत्या आणि कर्जबाजारीपणावर रेशीम शेती हा चांगला पर्याय आहे. एकदा लागवड केली की ३० वर्षे उत्पादन देणारी रेशीम शेती फायदेशीर असल्यानेच याच्या प्रसारावर मी लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. 

प्रश्न : या कामाची सुरुवात कुठून केली?उत्तर : मी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील तडसर या गावचा. स्वत:ची गुंठाभरही रेशीम शेती नसताना पहिल्यापासूनच आवड असल्याने रेशीम शेती हा विषय घेऊनच पीएच.डी. केली. १९८६ पासून यात काम सुरू केले. गेली ३३ वर्षे याच क्षेत्रात कार्य सुरूआहे. जिल्हा रेशीम अधिकारी पदाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग ते गोंदिया अशा १८ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत काम केले. क्युबा या देशाने मला रेशीम शेतीच्या प्रसारासाठी ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसडर म्हणून नेमले आहे. 

प्रश्न : सेरी टुरिझम हा काय प्रकार आहे?उत्तर : सेरी टुरिझम ही संकल्पना आपल्याकडे नवीन आहे. अळीपासून रेशमाचा धागा कसा तयार होतो. याचे सर्वांनाच कुतूहल असते. या टुरिझमच्या माध्यमातून हे कुतूहल शमविण्याचे काम होण्याबरोबरच उत्पादकांना पर्यटकांच्या माध्यमातून नवीन उत्पन्नाचा स्रोतही तयार होणार आहे.

प्रश्न : आंतरराष्ट्रीय स्तरावरील रेशीम तयार करण्याबाबतचे काय प्रयत्न सुरू आहेत?उत्तर : थोडे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे ज्ञान दिले तर रेशीम धाग्याची गुणवत्ताही राखता येते. त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रेशीम अळी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या. भारतात प्रांतनिहाय वेगवेगळे वातावरण असल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या अळ्या द्याव्या लागतात. शिवाय यास गेल्या वर्षापासून रोजगार हमीचीही जोड दिल्याने २ लाख ८२ हजार प्रती एकरी अनुदानही दिले जात आहे. शिवाय तयार झालेले रेशीम किमान १८० रुपये किलो दराने विकत घेण्याची हमीही शासनाने दिली आहे.वन्य रेशीम उत्पादनावर भरबंगळूरमध्ये मुख्यालय असलेल्या केंद्रीय रेशीम मंडळांतर्गत राज्य पातळीवर नागपूरमध्ये रेशीम संचलनालय स्थापन झाले आहे. या संचलनालयाच्या अंतर्गतच सल्लागार समिती काम करीत आहे. राज्याचे रेशीम विकासाचे धोरण ठरविण्याचे प्रमुख काम असणार आहे. या समिती अंतर्गत पहिल्याच टप्प्यात जंगल भागातील आदिवासी भागात टसर अर्थात वन्य रेशीमचे उत्पादन वाढविण्यावर भर दिला आहे. हे रेशीम अत्युच्च पातळीचे असल्याने त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरinterviewमुलाखत