यमनाप्पा आण्णासोा वडर (वय ३३), युवराज नागाप्पा वडर (२१), हृषिकेश कृष्णा पाटील (२१, तिघे रा. समतानगर), विक्रम बाळासोा गवळी (३४, रा. शिरटी) व तानाजी मोहन थोरवत (३४, रा. घालवाड) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकून दारूचे सोळा बॉक्स जप्त केले. ही कारवाई निरीक्षक पी. आर. पाटील, दुय्यम निरीक्षक वर्षा पाटील, राहुल गुरव, जी. एच. हजारे, सुभाष कोले, विलास पवार, प्रसन्नजित कांबळे यांनी केली. शिरोळ तालुक्यात अशाप्रकारे अवैध मद्यनिर्मिती, साठा, विक्री व वाहतूक आढळल्यास कडक कारवाई केली जाणार असल्याचे निरीक्षक पाटील यांनी सांगितले.
शिरोळमध्ये गोवा बनावटीची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:51 IST