शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

शहरात गणेश जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:24 IST

कोल्हापूर : शहरात सोमवारी गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. फुलांच्या माळांनी सजविलेला पाळणा जोजवत लाडक्या बालगणेशाचा जन्मकाळ सोहळ्याला ...

कोल्हापूर : शहरात सोमवारी गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. फुलांच्या माळांनी सजविलेला पाळणा जोजवत लाडक्या बालगणेशाचा जन्मकाळ सोहळ्याला शहरातील सर्व गणेश मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेश जयंती सोहळा साधेपणाने साजरा करत महाप्रसाद सोहळा रद्द केला, असे असले तरी होमहवन, अभिषेक आदी धार्मिक विधी करण्यात आले. प्रसादाचे वाटपही झाले.

गेल्या चार दिवसांपासून शहरातील सर्वच गणेश मंदिरांमध्ये गणेश जयंतीची जय्यत तयारी सुरू होती. परिसराची स्वच्छता, रंगरंगोटी झाल्यानंतर मंडप उभारणी, आकर्षक सजावट, रंगबिरंगी फुले, रांगोळ्यांची आरास आणि नेत्रदीपक विद्युत रोषणाईने मंदी परिसर उजळून निघाला होता.

चौकट

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने ओढ्यावरील सिद्धीविनायक गणेश मंदिरात जन्मकाळ सोहळा झाला. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सचिव विजय पोवार, कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव यांच्यासह पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

चौकट

शहर ‘गणेशमय’

करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील गारेचा गणेश, बिनखांबी गणेश मंदिर, ताराबाई पार्कमधील पितळी गणेश, हरिओमनगर येथील वरद विनायक मंदिर, राजारामपुरी शाहू वसाहत येथील २१ फुटी गणेश, कळंबा तलाव परिसर, रेसकोर्स गणेश मंदिर, रंकाळा टॉवर येथील जाऊळाचा बालगणेश मंदिर, आर. के. नगर येथील खडीचा गणपती, टिंबर मार्केट येथील गणेश मंदिर, गंगावेश रिक्षा स्टॉप येथील गणेश मंदिर, रंकाळा डी मार्टसमोरील गणेश मंदिर यासह शहरातील विविध गणेश मंदिरांमध्ये गणेश जयंतीचा सोहळा उत्साहात साजरा केला.

चौकट

आंब्यातील गणेश मंदिरात प्रसाद वाटप

आंबा, मानोली (ता.शाहूवाडी) येथील श्री गणेश मंदिरात गणेश जयंतीनिमित्त सकाळी १२.१७ वाजता जन्मसोहळा झाला. महाप्रसाद वाटप रद्द करून शिराचा प्रसाद वाटप करण्यात आले. विश्वस्त बिनखांबी गणेश रिक्षा मित्र मंडळाच्यावतीने कोरोनामुळे जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार ३४ वर्षांनी प्रथमच साध्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा केला.

फोटो : १५०२२०२१ कोल गणेश जयंती१

फोटो : १५०२२०२१ कोल गणेश जयंती२

फोटो : १५०२२०२१ कोल गणेश जयंती४

ओळी : कोल्हापुरातील ओढ्यावरील सिद्धीविनायक मंदिरात गणेश जयंतीनिमित्त सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

फोटो : १५०२२०२१ कोल गणेश जयंती३

ओळी : गणेश जयंतीनिमित्त भक्तांनी शहरातील सर्व गणेश मंदिरांत दर्शनासाठी गर्दी केली होती. यामध्ये बालचमूपासून ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता.

(छाया : नसीर अत्तार)