शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

पंचगंगा प्रदूषण देखरेखीसाठी ११ जणांंची समिती स्थापन

By admin | Updated: November 29, 2014 00:14 IST

२२ डिसेंबरला उच्च न्यायालयात अहवाल देणार

कोल्हापूर : पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सर्व पातळीवर एकत्रित प्रयत्न होण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे विभागीय आयुक्त विकास देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. अध्यक्षांसह आठ शासकीय सदस्य, ‘निरी’, याचिकाकर्ते व स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक सदस्य, अशा एकूण ११ सदस्यांची ही समिती २२ डिसेंबरला उच्च न्यायालयास पहिला अहवाल सादर करणार आहे.पर्यावरणीय अभ्यास करणाऱ्या ‘निरी’ संस्थेने प्रदूषण रोखण्याबाबत केलेल्या शिफारशींचा योग्य पद्धतीने अभ्यास करणे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता ही समिती नेमण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना न्यायालयाने १० नोव्हेंबरला दिले होते. यानुसार विभागीय आयुक्तांनी २६ नोव्हेंबरला समितीची घोषणा केली आहे. याबाबचे पत्र आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना आज, शुक्रवारी मिळाले.पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा असूनही सर्वच घटकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार प्रजासत्ताक सामाजिक संस्थेसह इतर पर्यावरणवाद्यांनी न्यायालयात याचिकेद्वारे केली होती. तसेच प्रदूषण रोखण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी न्यायालयाकडे झाली होती.या समितीमुळे पंचगंगा प्रदूषणाबाबत थेट न्यायालयात गाऱ्हाणे मांडले जाणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांनी नेमलेल्या आठ सदस्यांत याचिकाकर्त्यांचे नाव नाही. मात्र, न्यायालयाने दिलेल्या निकालपत्रानुसार २०१० साली सर्वांत प्रथम याचिकाकर्ता या नात्याने व न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्रजासत्ताक सामाजिक संस्थेतर्फे स्वत: या समितीवर सदस्य असणार आहे, असे दिलीप देसाई यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ११ लोकांची ही उच्चस्तरीय समिती प्रत्येक तीन महिन्यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती अहवालाद्वारे न्यायालयाला सादर करणार आहे. या समितीला २२ डिसेंबरला पहिला अहवाल उच्च न्यायालयात देणे बंधनकारक आहे. (प्रतिनिधी) अशी आहे समितीअध्यक्ष - विकास देशमुख (विभागीय आयुक्त पुणे विभाग)समन्वयक व सचिव - नानासाहेब बोटे (उपायुक्त - महसूल, पुणे विभाग)सदस्य- राजाराम माने (जिल्हाधिकारी)विजयालक्ष्मी बिदरी (आयुक्त महापालिका)डॉ. मनोजकुमार शर्मा (पोलीस अधीक्षक)अविनाश सुभेदार (सी.ई.ओ. जिल्हा परिषद)एस. एस. डोके (प्रादेशिक अधिकारी-महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ)सुनील पोवार (सी.ओ. इचलकरंजी पालिका) ‘निरी’, स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे एक, पर्यावरण अभ्यास, तसेच याचिकाकर्त्यातर्फे प्रजासत्ताकचे दिलीप देसाई, असे एकूण ११ सदस्य असणार आहेत.