शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

अस्थिरतेमुळे यंत्रमागधारक मेटाकुटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:35 IST

अतुल आंबी।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : वाढलेले वीज दर, कामगारांची मजुरीवाढ, मिल स्टोअर्स खर्चात वाढ याबरोबरच वस्त्रोद्योगातील वहिफणीपासून ते तयार झालेले कापड नेणाºया टेम्पो भाड्यापर्यंत सर्व इतर घटकांच्या खर्चात वाढ झाली आहे. याउलट सन २०१३ मध्ये कापडाला असलेला २४ रुपये मीटर भाव साडेपंचवीसपर्यंत पोहोचून पुन्हा २४ रुपयांवर आला आहे. कापडाचा दर ...

अतुल आंबी।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : वाढलेले वीज दर, कामगारांची मजुरीवाढ, मिल स्टोअर्स खर्चात वाढ याबरोबरच वस्त्रोद्योगातील वहिफणीपासून ते तयार झालेले कापड नेणाºया टेम्पो भाड्यापर्यंत सर्व इतर घटकांच्या खर्चात वाढ झाली आहे. याउलट सन २०१३ मध्ये कापडाला असलेला २४ रुपये मीटर भाव साडेपंचवीसपर्यंत पोहोचून पुन्हा २४ रुपयांवर आला आहे. कापडाचा दर ‘जैसे थे’ असताना वाढलेला इतर खर्च यामुळे यंत्रमागधारक मेटाकुटीला आला आहे. यामध्ये शासनाकडूनही ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. या घडामोडींमुळे वस्त्रोद्योगात अस्थिरता निर्माण झाली असली तरी कष्टातून उभारलेला वडिलार्जित व्यवसाय म्हणून अनेक तरुण उद्योजक व्यवसाय जेमतेम चालवीत आहेत. या व्यवसायातील अनेकांची अवस्था ‘धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय’ अशी बनली आहे.इचलकरंजी शहरात साधारण एक लाख साधे यंत्रमाग आहेत. या यंत्रमागावर उत्पादित होणाºया वेगवेगळ्या उत्पादनांपैकी उदाहरण म्हणून पॉपलीन ८०/५२ या उत्पादनाचा पाच वर्षांतील आढावा घेतल्यास सन २०१३ मध्ये या कापडाला २४ रुपये मीटर असा दर होता. तो २०१४ साली २५, सन २०१५ साली २५.५० पर्यंत वाढला होता. त्यानंतर पुन्हा खाली जात आज परत २४ रुपयांवर येऊन ठेपला आहे. पाच वर्षांतील सुताचे भाव पाहता २०१३ मध्ये एक हजार रुपये होता. तो २०१४ मध्ये ८१० रुपये, २०१५ मध्ये ८५० रुपये होता. तेथून वाढत सध्या एक हजार ५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. २०१४-१५ मध्ये सुताचा दर कमी व कापडाला चांगला दर मिळाल्यामुळे या साध्या यंत्रमागधारकाला थोडाफार फायदा मिळविता आला. मात्र, २०१५-१६ नंतर आजतागायत व्यवसायाची परिस्थिती बिकट राहिली आहे. २०१३ मध्ये दोन रुपये ६० पैसे प्रतियुनिट असलेली वीज आज तीन रुपये ५० पैशांपर्यंत पोहोचली आहे. याबरोबर कामगारांची मजुरीवाढ, दिवाणजी, जॉबर, कांडीवाले, वहिफणी, वाहतूकदार, सायझिंग-वार्पिंग, प्रोसेसिंग अशा सर्व खर्चात वाढ झाली आहे. वस्त्रोद्योगात सध्या निर्माण झालेली परिस्थिती पाहता त्यावर शासनाकडून आखल्या जाणाºया उपाययोजना तोकड्या पडत आहेत. त्यासाठी ठोस वस्त्रोद्योग धोरण अवलंबून त्या माध्यमातून या उद्योगाला नवसंजीवनी देण्याची गरज आहे.नफेखोरीमुळे अडचणींत वाढसूत दर व कापड दर यातील नफेखोरीमुळे या व्यवसायात अडचणी वाढल्या आहेत. यावर शासनाचा अथवा प्रशासनाचा कोणत्याही प्रकारचा वचक नसल्याने नफेखोरी करणाºयांचे चांगलेच फावते. वस्त्रोद्योग क्षेत्रातील कामगार, यंत्रमागधारक यासह अन्य घटकांत काम करणारे यांची मागील पाच-दहा वर्षांतील प्रगती व नफेखोरी करणाºया सूत व कापड या क्षेत्रात व्यवसाय करणाºयांच्या प्रगतीचा आढावा घेतल्यास दिसून येणारी मोठी तफावत हा मोठा संशोधनाचा विषय बनला आहे.फायदा-तोटा समजून येत नाहीसूत खरेदी केलेल्या दिवसानंतर पंधरा ते वीस दिवसांनी त्याचे कापड विक्रीसाठी तयार होते. त्यामुळे सूत खरेदी केलेला दर व कापड तयार झाल्यानंतर विक्री करताना त्याला बाजारात उपलब्ध झालेला दर यातील तफावत याचा हिशेब सर्वसामान्य यंत्रमागधारकाला लागत नसल्याने नेमका फायदा-तोटा समजून येत नाही.नफेखोरीचे एक उदाहरणकापूस कमोडिटी मार्केटमध्ये असल्यामुळे त्याचे दर वारंवार बदलत राहतात. कापसापासून सूत तयार होऊन ते बाजारात विक्रीसाठी येईपर्यंत मध्ये पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी जातो. असे असले तरी मार्केटमध्ये कापसाचा दर वाढला की काही सूत व्यापारी त्याचवेळी सुताचा दरही वाढवितात आणि कापसाचा दर कमी झाल्यास सूत संपले, असे सांगून दरवाढ झाल्यानंतर विक्री करतात. त्यामुळे प्रामाणिकपणे व्यापार करणाºयांनाही याचा त्रास होतो. नफेखोरीचे हे छोटे उदाहरण आहे, असे या वस्त्रोद्योग क्षेत्रात अनेक टप्प्यांवर घडते.