पट्टणकोडोली : अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या सहा कोटींच्या राष्ट्रीय पेयजल पाणी योजनेच्या माहितीसाठी बोलावण्यात आलेली खास ग्रामसभा झाली. यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाली व सूचना करण्यात आल्या. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच महेश नाझरे होते. पट्टणकोडोली राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामकाजाला काहींनी विरोध केल्याच्या कारणावरून ग्रामपंचायतीने व पाणीपुरवठा विभागाने आज ग्रामपंचायत कार्यालयासमोर विशेष ग्रामसभा घेतली. यामध्ये पंचायत समितीचे पाणीपुरवठा शाखा अभियंता पवार यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली.यावेळी यावेळी नागरिकांनीही पेयजल योजनेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच महेश नाझरे यांनी केले. बोगस नळ कनेक्शनधारकांवर योग्य ती कारवाई लवकरात लवकर करण्याचा ठराव झाला. सन २०२९ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन या योजनेचे काम करावे, तसेच अर्धा इंचीचे कनेक्शन प्रत्येकाला देण्यात यावे, असे ठराव गोगा बाणदार व ‘आप’चे नंदू कीर्तीकर यांनी मांडले.यावेळी या योजनेचे ठेकेदार माने हे अनुपस्थित असल्याने अनेकांनी या कामाच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्त केली. त्यामुळे कामाचा दर्जा योग्य आणि नियोजनबद्ध करण्याची मागणी झाली. यावेळी उपसभापती प्रभावती पाटील, किसन तिरपणकर, ग्रामपंचायत सदस्य खाना अवघडे, संतोष शेळके, संगीता माळी, सुनील रास्ते, मदन चौगुले, पोपट बाणदार, आप्पासो चेटके यांच्यासह बीरू धनगर, प्रकाश बोंगाळे, विजय रजपूत व ग्रामविकास अधिकारी प्रकाश कांबळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( प्रतिनिधी )नागरिक आक्रमकयोजनेचे महत्त्व जाणून नागरिकांनी ग्रामपंचायत सदस्यांना काहीच बोलू न देता योजना पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर काम सुरू करण्यात यावे, अशा सूचना मांडल्या.
पट्टणकोडोली ग्रामसभेत पेयजल योजनेवर चर्चा
By admin | Updated: January 20, 2015 23:48 IST