कोल्हापूर : वाकरे (ता. करवीर) येथे ऊस तोडणीवरून भाऊबंदकीत झालेल्या हाणामारीत दोन्हीही गटांचे सातजण जखमी झाले. ही घटना शनिवारी घडली. संदीप तुकाराम करपे (वय ४०), संभाजी लक्ष्मण करपे (५८), बापू विष्णू पाटील (४१), प्रमोद संभाजी करपे (२८) तसेच तानाजी लक्ष्मण करपे (४५), वंदना तानाजी करपे (४३), वैष्णवी तानाजी करपे (१८ सर्व रा. वाकरे ता, करवीर) अशी दोन्हीही गटांची नावे आहेत. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नागावात मुलाला दुचाकीची धडक
कोल्हापूर : भरधाव दुचाकीने पाठीमागून ठोकरल्याने सहा वर्षाचा पादचारी मुलगा गंभीर जखमी झाला. उमरअली सिराज कोलूर (रा. नागाव, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. नागावनजीक हा अपघात झाला. त्याला उपचारासाठी सीपीअर रुग्णालयात दाखल केेले.