शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

गाय दूध उत्पादकांना ‘अच्छे दिन’

By admin | Updated: January 14, 2017 00:41 IST

दूध पावडर दरवाढीचा परिणाम : नाक मुरडणाऱ्या संघाचे उत्पादकांना साकडे

राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूरदेशांतर्गत बाजारपेठेसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरचे दर एकदम वाढल्याने गाय दुधाची मागणी वाढली आहे. सध्या २२० रुपये किलो पावडर तर ३५० किलो बटरचे दर आहेत. त्यामुळे एरव्ही गाय दूध म्हटले की, नाक मुरडणाऱ्या संघांनी दरवाढीच्या माध्यमातून उत्पादकांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केल्याने गाय दूध उत्पादकांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. बहुतांश गाय दुधाची पावडर केली जाते. यामध्ये खासगी दूध संघ आघाडीवर आहेत. पावडरचे दर अस्थिर असल्याने गायीच्या दुधाला त्या प्रमाणातच मागणी व दर असतो. गेले वर्षभर पावडरचे दर घसरल्याने संघ अडचणीत आले. अनेकांनी गायीचे दूध स्वीकारणे बंद करून पावडर प्लॅँट बंद केले. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केल्यास गेले दहा वर्षांत गाय दूध झपाट्याने वाढू लागले आहे. म्हशीचा भाकड काळ जास्त असल्याने शेतकरी गायीकडे वळले आहेत. मध्यंतरीच्या काळात दूध संघांनीही प्रोत्साहन दिल्याने गाय दुध संकलनात वाढ झाली. ‘गोकुळ’चा विचार केला तर एकूण संकलनाच्या निम्मे दूध गायीचे आहे. दूध जास्त झाल्याने ‘गोकुळ’ने म्हैस दूध उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना आवाहन करत म्हैस दूधाला दोन रुपये तर गायीला रुपया वाढ देण्याचा निर्णय घेतल्याने उत्पादक अडचणीत आले आहेत. म्हशीपेक्षा गायीचे दर जास्त आहेत, मात्र दुधाला दर कमी व पशुखाद्य म्हशीपेक्षा अधिक लागत असल्याने उत्पादनखर्च आवाक्याबाहेर गेला आहे. म्हशीच्या तुलनेत गाय दुधाला लिटर मागे पंधरा रुपये कमी मिळतात. डिसेंबर-जानेवारीमध्ये दुधाचे उत्पादन वाढते, पण यंदा तुलनेने कमी असून पावडरसाठी दूध उपलब्ध झाले नाही. त्यातच दूध पावडरचे दर २२० रुपये तर बटरचे दर ३५० रुपये किलोपर्यंत गेल्याने संघांना आता गाय दुधाची गरज वाटत आहे. महिन्यात दोनवेळा गाय दुधाची दरवाढ झाली आहे. बक्षिसाच्या रकमेत दुजाभाव!वास्तविक दूध संघासमोर दूध उत्पादक हा सारखाच असायला हवा. मार्केट पॉलिसी म्हणून दरातील तफावत उत्पादकांना मान्य आहे; पण स्पर्धेसाठी गाय व म्हैस दूध उत्पादकाला तेवढेच कष्ट पडतात, त्यामध्ये दुजाभाव असणे योग्य नाही. यावर्षीपासून ‘गोकुळ श्री’ स्पर्धेच्या बक्षिसात गायीच्या तुलनेत म्हैस उत्पादकाला पाच हजार रुपये जादा रक्कम देण्याचा निर्णय घेतला.