शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

शहराची हद्दवाढ ‘विश्वासात’ अडकली

By admin | Updated: June 27, 2015 00:55 IST

प्रश्न सुटणार कसा : ‘मनपा’ची डागाळलेली प्रतिमाच विरोधाला कारणीभूत; गावापेक्षा नेत्यांची समजूत काढणे महत्त्वाचे

राजाराम लोंढे - कोल्हापू -महापालिकेची डागाळलेली प्रतिमा, सुविधांची वानवा यामुळेच ग्रामीण जनता शहरात येण्यास उत्सुक नाही. गावांचा विरोध आहे, म्हणूनच नेत्यांचाही हद्दवाढीस राजकीय विरोध आहे. यासाठी पालिका प्रशासनाबरोबर राजकीय नेत्यांनी ग्रामीण जनतेमध्ये विकासाचा विश्वास निर्माण करण्याची खरी गरज आहे. तसे केले तरच हद्दवाढीचा गुंता सुटू शकतो; अन्यथा ग्रामीण व शहरी संघर्ष अटळ आहे. कोल्हापूरच्या हद्दवाढीचा प्रश्न गेले अनेक वर्षे भिजत पडला आहे. १९९० ला महापालिकेने हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे दिला होता. मुळात हद्दवाढीबाबत येथून पाठीमागे महापालिका प्रशासनाचे अपुरे पडलेले प्रयत्न व राजकीय उदासीनता यामुळे हा प्रश्न तब्बल २५ वर्षे लोंबकळत पडला आहे. आता नव्याने शहरातील राजकीय मंडळींच्या नेत्यांनी हद्दवाढीसाठी जोर धरला आहे. विस्तारित हद्दवाढीचा प्रस्ताव नव्याने शासनाकडे सादर करून ताकद लावली आहे. शहराच्या विकासासाठी हद्दवाढ करणे हे गरजेचे आहे, याबाबत कोणालाच दुमत नाही; पण केवळ एकतर्फी प्रयत्न सुरू करणे योग्य होणार नाहीत. पहिल्यांदा ग्रामीण जनतेला विश्वासात घेऊन त्यांचे मतपरिवर्तन करणे गरजेचे आहे. शहरातील जनताच महापालिकेच्या कारभारावर नाराज आहे, हा संदेश ग्रामीण जनतेपर्यंत अगोदरच पोहोचला आहे. त्यामुळे आमचा चाललेला गाडा बरा, अशी ग्रामीण जनतेची भूमिका आहे. याला कारणीभूतही महापालिकेचे प्रशासनच आहे. ही मानसिकता बदलण्यासाठी पहिल्यांदा हद्दवाढ झाली तर नेमके ग्रामीण जनतेसह मूळ शहराला काय फायदे होणार, हे सांगणे गरजेचे आहे. तसे न करता शहरातील नेत्यांनी एकदम गावे ताब्यात घेण्याची मोहीम उघडली आहे. केवळ महापालिकेला केंद्रातून निधी मिळणार, या एकमेव उद्देशाने प्रयत्न सुरू आहेत. एकतर्फी भूमिका घेऊन शहरातील कृती समितीने हद्दवाढीचा हट्ट धरला आहे. त्यामुळे त्याचे ग्रामीण भागात पडसाद उमटणे साहजिकच आहे. यासाठी ग्रामीण जनतेमध्ये विकासाचा विश्वास निर्माण करून हद्दवाढीसाठी प्रयत्न केले, तरच हा गुंता सुटू शकतो; अन्यथा ग्रामीण व शहरी संघर्ष अटळ आहे. ग्रामीण जनतेचा विरोध का?पाणी महागणार - ग्रामपंचायतीची वर्षाची पाणीपट्टी महापालिकेला महिन्याला द्यावी लागणार.घरफाळा - दुप्पट होणार उपजीविकेचे साधन असणाऱ्या शेती व जनावरांवर गंडांतर ग्रामीण बाज संपुष्टात येणार ढपला संस्कृतीने विकास होणार का, याविषयी साशंकता पैसे दिले तरी सुविधा मिळण्याची खात्री नाहीशहरात आल्यावर काय फायदा होणार गावांना शिस्त लागेलपरिसराचा विकास होण्यास मदत अंगणवाडी, बगीचा, शाळांना जागा आरक्षितअस्थाव्यस्त बांधकामांवर पायबंद येणार बस, रस्ते, भुयारी गटारी, विजेची सोयविरोध करणारे नेतेच शहरातहद्दवाढीला आमदार चंद्रदीप नरके, पी. एन. पाटील, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार अमल महाडिक या नेत्यांचा थेट विरोध आहे, तर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचीही मानसिकता तशीच आहे. परंतु, महाडिक वगळता हे सर्वच नेते कोल्हापूर शहरात राहतात, हे वैशिष्ट्य आहे.हद्दवाढीशिवाय शहराचा विकास नाही : हसन मुश्रीफहद्दवाढ झाल्याशिवाय शहराचा विकास होणार नाही; त्यामुळे एक किलोमीटरच्या परिघात होणाऱ्या हद्दवाढीला विरोध असण्याचे कारण नाही. कारण शहरानजीक असणाऱ्या गावांना महापालिकेच्या सर्व सुविधांचा लाभ होतो. त्यामुळे हद्दवाढीला आपला पाठिंबा राहील, असे माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी ‘लोकमत’ला सांगितले.मुश्रीफ म्हणाले, हद्दवाढीसंदर्भात असणारे गैरसमज दूर करण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न झाले पाहिजेत. शहराच्या एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गावांना महापालिकेच्या सुविधांचा लाभ होतो. त्यामुळे तेथील जमिनींचे भावही वाढले आहेत. शहराची हद्दवाढ होणे गरजेचे आहे. केंद्र सरकारकडून शहराच्या विकासासाठी मिळणाऱ्या निधीसाठी लोकसंख्या हा निकष आहे. त्यामध्ये कोल्हापूर शहर बसत नाही. यासाठी हद्दवाढ गरजेची असून, त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी विकासासाठी उपलब्ध होणार आहे. हद्दवाढीमध्ये समाविष्ट असणाऱ्या गावांना सुरुवातीची पाच वर्षे घरफाळा नसतो, तसेच इतर आनुषंगिक करांची वाढही करता येत नाही. हद्दवाढ होणे गरजेचे आहे.