शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

बोरगाव पुलासंदर्भात निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

By admin | Updated: July 14, 2014 01:00 IST

बंधारा झाला कुमकुवत

कोल्हापूर : गेले दोन दिवस जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा आज, रविवारी पहाटे पाण्याखाली गेला. कोगे व शिंगणापूर बंधाराही पाण्याखाली गेला आहे. धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असून कोदे धरण क्षेत्रात सर्वाधिक २३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गगनबावडा, राधानगरीसह धरण क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली तर भुदरगड, शाहूवाडी, आजरासह करवीर तालुक्यातही दमदार पावसामुळे बळिराजासह नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. शिरोळ तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने पंचगंगा, कृष्णा नदी दुथडी भरुन वाहत आहेत. कागल शहर आणि परिसरातही दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. पन्हाळ्यात पावसाने आज दमदार हजेरी लावल्याने बळिराजा सुखावला आहे. गगनबावडा, राधानगरीत अतिवृष्टीराजाराम बंधारा पाण्याखाली : धरण क्षेत्रांत धुवाधार; बळिराजासह जिल्हावासीयांत समाधानकोल्हापूर : गेले दोन दिवस जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा आज, पहाटेच पाण्याखाली गेला. कोगे व शिंगणापूर बंधाराही पाण्याखाली गेला आहे. धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असून, कोदे धरण क्षेत्रात सर्वाधिक २३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर वाढू लागला आहे. शनिवारी रात्रभर जिल्ह्यात एकसारखा पाऊस सुरू होता. आज, रविवारी सकाळी थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा सुरुवात केली. कोल्हापूर शहरात अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. पावसाबरोबर वारेही वाहत असल्याने वातावरणात कमालीचा गारठा जाणवत आहे. जिल्ह्यात पाऊस जोरात सुरू असल्याने पंचगंगा नदीची पातळी एका दिवसात पाच फुटांनी वाढली आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत गगनबावडा तालुक्यात १२७.५०, चंदगडमध्ये ६८.३३, भुदरगडमध्ये ५०.८०, राधानगरीमध्ये ५३.५०, शाहूवाडीमध्ये ३९, आजरा येथे ४०.५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज १७.५ फुटांवर पातळी राहिली आहे. पंचगंगा नदीवरील वडणगे- कसबा बावडा यांना जोडणारा राजाराम बंधारा पहाटेच पाण्याखाली गेला. सध्या या बंधाऱ्यावर दोन फूट पाणी आहे. त्यातून वाहतूक मात्र सुरू आहे. धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू आहे. राधानगरीत १६७ मिलीमीटर, घटप्रभा १७९, तर पाटगाव धरण क्षेत्रात १६७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण ३१ टक्के, वारणा ३६ टक्के तर दूधगंगा २२ टक्के भरले आहे.