शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

युवतीचा निर्घृण खून

By admin | Updated: June 22, 2016 00:59 IST

कारण अस्पष्ट : शिवाजी पूल पंचगंगा नदीघाटाशेजारील घटना

कोल्हापूर : शिवाजी पुलानजीक वडणगे गावच्या हद्दीतील निर्जनस्थळी अंदाजे २२ वर्षांच्या युवतीचा अज्ञाताने धारदार सत्तुराने खून केल्याचा प्रकार मंगळवारी पहाटे उघडकीस आला. युवतीच्या मानेवर, पोटावर, हातावर अठरा वार केले आहेत. युवतीची ओळख, खून कोणी केला, कोणत्या कारणातून केला, हे अद्याप (पान १४ वर)स्पष्ट झालेले नाही. तिची ओळख पटल्यानंतर खुनाचे रहस्य उलगडणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शिवाजी पूल, पंचगंगा नदीघाटावर नेहमी अंघोळीसाठी नागरिकांची गर्दी असते. नेहमीप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते उदय निंबाळकर हे मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास अंघोळ करून नदीपलीकडे असलेल्या पाटील महाराज समाधिमंदिरात दर्शन घेण्यासाठी जात असताना त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली युवती दिसून आली. त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना या घटनेची वर्दी दिली. लक्ष्मीपुरी व करवीर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. युवतीच्या शरीरातून रक्तस्राव होत होता. त्यामुळे ती जिवंत असल्याची शक्यता व्यक्त करीत रुग्णवाहिका मागविली. त्यातून तिला सी.पी.आर. रुग्णालयामध्ये आणले असता ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदन विभागात मृतदेहाची पाहणी केली असता तिच्या अंगावर एकूण अठरा गंभीर वार केल्याचे दिसून आले. पोलिसांना घटनास्थळी युवतीच्या मृतदेहापासून तीस फूट अंतरावर रक्ताने माखलेला सत्तूर मिळून आला. पाटील महाराज समाधिमंदिराच्या उजव्या बाजूला रिकामा माळ आहे. हा परिसर निर्जन आहे. सायंकाळी सहानंतर या परिसरात सन्नाटा पसरलेला असतो. मारेकरी हा युवतीला मोटारसायकलवरून घेऊन याठिकाणी आला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. खून हा पहाटे चारच्या सुमारास झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मारेकऱ्याने हेच ठिकाण का निवडले, युवतीनेही त्याच्यासोबत अशा निर्जनस्थळी येण्याचे धाडस केले कसे, यापूर्वी मारेकरी याठिकाणी टेहळणी करून गेल्याची शक्यता आहे. अशा अनेक मुद्द्यांवर पोलिस तपास करीत आहेत. घटनास्थळावरील दृश्य पाहता युवतीवर अत्याचार झालेला दिसत नाही. मारेकऱ्याने तिच्यावर सत्तुराने हल्ला केल्यानंतर तिने त्याला हातांनी प्रतिकार केल्याने तिच्या हातावर जखमा दिसत आहेत. अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, पोलिस उपअधीक्षक अमर जाधव, पोलिस निरीक्षक दिलीप जाधव व स्थानिक गुन्हे अन्वेशण शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वानपथकाच्या श्वानाला युवतीच्या कपड्यांचा व सत्तुराचा वास दिला असता ते परिसरातचघुटमळले. (प्रतिनिधी) ते कार्ड शुक्रवार पेठेतील तरुणाचे युवतीच्या मृतदेहापासून काही अंतरावर एक फोटो कार्ड पोलिसांना मिळून आले. ते कार्ड पोलिसांना युवतीची ओळख व मारेकऱ्यापर्यंत पोहोचविण्याचा मोठा पुरावा होता. त्या दृष्टीने तपास केला असता ते कार्ड ओमकार नागवेकर (रा. पिवळा वाडा, बुरुड गल्ली) याचे असल्याचे निष्पन्न झाले. त्याला पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी केली असता त्याने आपला कॅमेरा मित्र पीयूष ससे (रा. डांगे गल्ली, शुक्रवार पेठ) याला दिल्याचे सांगितले. त्यालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने दि. १६ जून रोजी आपण त्याठिकाणी फोटो काढण्यासाठी गेलो होतो. यावेळी कॅमेऱ्यातील कार्ड बाहेर काढून ते खिशामध्ये ठेवत असताना पडले होते. दुसरे कार्ड टाकून फोटो काढल्याचे सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीची पोलिस खातरजमा करीत आहेत. मृत युवतीचे छायाचित्र त्यांना दाखविले असता दोघांनीही तिला ओळखत नसल्याचे सांगितले. एजंटांची चौकशी युवतीची ओळख पटविण्याचा पोलिस दिवसभर आटोकाट प्रयत्न करीत होते. ती हायफाय कॉलगर्ल असण्याची शक्यता ओळखून शहरातील चार एजंटांकडे रात्री उशिरापर्यंत करवीर पोलिस ठाण्यात चौकशी सुरू होती. पापाची तिकटी येथील काही आॅर्केस्ट्रॉच्या कार्यालयांतही पोलिसांनी चौकशी केली. त्या युवतीचा चेहरा व पोशाख बंगाली असल्याने पोलिस त्या दृष्टीने तपास करीत आहेत. —————————————————————— फोटो : २१०६२०१६-कोल-खून ०१ कोल्हापूर येथील पंचगंगा शिवाजी पुलानजीक निर्जनस्थळी युवतीचा खून झालेल्या घटनास्थळाची मंगळवारी पाहणी करताना अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, पोलिस उपअधीक्षक अमर जाधव, पोलिस निरीक्षक दिलीप जाधव. (छाया : नसीर अत्तार) ——————————————- फोटो : २१०६२०१६-कोल-खून ०२ मारेकऱ्याचा माग काढताना श्वानपथक. ——————————————- फोटो : २१०६२०१६-कोल-खून ०३ मारेकऱ्याने खून करण्यासाठी वापरलेला सत्तूर हॉटेल, लॉजची झाडाझडती मृत युवती व मारेकरी पहाटे शिवाजी पुलानजीकच्या निर्जनस्थळी आले आहेत. त्यामुळे ते रात्री हॉटेल-लॉजवर उतरले असण्याची शक्यता आहे. त्यानुसार शहरातील व शहराबाहेरील पन्हाळा रोडवरील हॉटेल-लॉजवर माहिती घेण्यासाठी एक पथक रवाना केले आहे. युवतीचे वर्णन मृत युवतीच्या अंगावर गुलाबी रंगाचा टॉप व निळ्या रंगाची लेगीन जीन्स आहे. टॉपवर रॉक-गर्ल लिहिले आहे. कानांत बनावट टॉप्स व हातात अंगठी आहे. ती रंगाने गोरी आहे. तिच्या कमरेला काळा दोरा व पायांत चप्पल आहे. पोलिस दोन्ही बाजूंनी तपास करीत आहेत. तिचे छायाचित्र व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवरून सर्वत्र पाठविले आहे. शिवाजी पूल, व पन्हाळा रस्त्यांवरील काही सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासत आहेत. या रस्त्यावरून कदाचित युवती व मारेकरी मोटारसायकलवरून गेल्याचे फुटेज मिळेल.