शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

नोकरदारांना बोनसचे वेध

By admin | Updated: October 2, 2014 23:30 IST

दिवाळीचा बोनस : सहकारक्षेत्र आघाडीवर, तर सरकारी कर्मचारी प्रतीक्षेत

रमेश पाटील - कसबा बावडा -दिवाळी सण तोंडावर आल्याने अनेक क्षेत्रातील नोकरदारांना आता बोनसचे वेध लागले आहेत; मात्र काही ठिकाणी औद्योगिक क्षेत्रात मंदीचे कारण सांगून बोनसची टक्केवारी कमी करण्याचा प्रयत्न सुरूआहे. त्यामुळे कामगार वर्गात असंतोष आहे. सहकार क्षेत्रात सध्या बऱ्यापैकी बोनस दिला जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा बोनस गेल्या काही वर्षांपासून बंद करण्यात आला आहे.सहकार क्षेत्रातील बॅँका, साखर कारखाने, दूध संघ, विकास सेवा संस्था, गावागावांतील दूध डेअरी, आदी संस्थांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस किती दिला जाणार आहे याची घोषणा वार्षिक सर्वसाधारण सभेतच केली जाते. चांगल्या नफ्यात असलेल्या संस्था ८.३३ (एक महिन्याचा पगार) टक्क्यांपासून ते ३३ टक्क्यांपर्यंत बोनस देतात. ज्या संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत, अशा संस्थांनी तर कर्मचाऱ्यांना दिवाळीला जादा बोनसची घोषणा करून अधिकच गोड करण्याचा प्रयत्न केला आहे.औद्योगिक क्षेत्रात अनेक ठिकाणी सध्या व्यवस्थापन व कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी यांच्यात बोनसच्या प्रश्नासंबंधी वाटाघाटी सुरू आहेत. काही कंपन्यांनी यातून समाधानकारक तोडगा काढून बोनसचा प्रश्न मिटवला आहे. काही कंपन्यांनी मंदीचे कारण पुढे करून बोनसची टक्केवारी कमी करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस गेल्या अनेक वर्षांपासून बंद करण्यात आला आहे. काही महापालिकेत कर्मचाऱ्यांना बोनसऐवजी काही रक्कम अ‍ॅडव्हान्स म्हणून दिली जाते. दिवाळीनंतर येणाऱ्या तीन महिन्यांत समान हप्त्यांत ती रक्कम पगारातून कपात केली जाते; परंतु आता अ‍ॅडव्हान्स रक्कम देण्यासही अनेक महापालिकांनी बंद केले आहे. खासगी कंपन्यांमध्ये (औद्योगिक नव्हे) एकूण नफ्याच्या प्रमाणात बोनस दिला जात आहे. चांगल्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना बोनसबरोबरच एक्स ग्रोसिपा (सानुग्रह अनुदान) देत आहेत. एकंदरीत सध्या नोकरदारांमध्ये बोनसची चर्चा जोरात सुरू आहे. दिवाळीच्या अगोदर आठवडाभर आधी ही बोनसची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होईल.बँकेच्या कर्मचाऱ्यांना बोनस नाहीराष्ट्रीयीकृत बॅँकेच्या कर्मचाऱ्यांनाही बोनस मिळत नाही. ज्यांना दहा हजारांच्या आत पगार आहे, त्यांनाच बोनस दिला जातो, असा नियम आहे; परंतु सध्या दहा हजारांच्या आत पगार घेणारा एकही कर्मचारी राष्ट्रीयीकृत बॅँकेत नाही.