शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘भोगावती’त ५८० कामगारांची जंबो भरती

By admin | Updated: December 4, 2015 00:22 IST

प्रशासनाने दिल्या आॅर्डर : नेत्यांच्या विरोधाला केराची टोपली; संचालकांची मुले, नातेवाइकांना संधी दिल्याची चर्चा

तानाजी पोवार-- कोल्हापूर--साखर कारखानदारी अडचणीत असताना परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्यात तब्बल ५८० जणांची जंबो नोकरभरती गुरुवारी करण्यात आली. शासनाचा व नेत्यांचाही आदेश डावलून भरतीच्या आॅर्डर्स देण्यात आल्या असून यातही संचालकांच्या सग्या-सोयऱ्यांचा भरणा केल्याचे समजते. या नोकरभरतीमुळे कारखान्यावर साहजिकच मोठा आर्थिक बोजा पडणार आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. एस. पाटील यांनी मात्र रिक्त झालेल्या सुमारे ४०० जागांवरच ही भरती केली असल्याचे सांगितले. कारखान्यावर राष्ट्रवादी व शेकापची सत्ता असून कारखान्याचे संस्थापक दादासाहेब पाटील-कौलवकर यांचे नातू धैर्यशील पाटील यांच्याकडे गेली पाच वर्षे अध्यक्षपद आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती व साखरेचे पडलेले दर यामुळे राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत आहे. शेतकऱ्यांना ‘एफआरपी’प्रमाणे भाव देण्यासाठी कारखान्याकडे पैसे नाहीत. अशा परिस्थितीत साखर कारखान्यात जंबो नोकरभरती करणे म्हणजे आर्थिक संकटात ओढण्याचा प्रकार आहे. विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या प्रमाणात नोकरभरती करताना प्रादेशिक साखर सहसंचालक व साखर आयुक्तांंची परवानगी आवश्यक असते; पण चार महिन्यांपूर्वी साखर सहसंचालकांनी कारखान्याला नोकरभरतीबाबत दिलेल्या पत्राला या सत्तारूढांनी केराची टोपली दाखविली आहे. कारखान्यावर काँग्रेसची सत्ता असताना २००९ साली भरती करण्यात आलेल्या ७० रोजंदारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादी-शेकापची सत्ता आल्यानंतर कामावरून कमी करण्यात आले. त्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला डावलून नव्याने नोकरभरती करू नये, याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे. हे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. कारखान्याचे अध्यक्ष व संचालकांनी नव्याने नोकरभरती करणार नसल्याचे लेखी आश्वासन साखर आयुक्तांना दिले होते; पण तीन वर्षांपूर्वी कारखान्यात नोकरभरतीचे गुऱ्हाळ पुन्हा सुरू झाले; त्यावेळी नोकरभरतीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याच्या चर्चेमुळे अध्यक्षांनी या भरतीला ‘खो’ घातला होता, पण त्यानंतर गुरुवारी भरतीच्या थेट आॅर्डर्सच उमेदवारांना दिल्याने खळबळ उडाली आहे. विद्यमान संचालकांना कारखान्यात नव्याने नोकरभरती करता येत नाही. असे पत्रही साखर सहसंचालकांनी यापूर्वी प्रशासनाला दिलेले आहे. या कारखान्यातील संचालकांची मुदत यापूर्वीच संपली आहे; त्यामुळे अशा पद्धतीने नोकरभरतीचा निर्णय ते कोणालाही न जुमानता घेत आहेत; या नोकरभरतीला आम्ही विरोध करु. -पी. एन. पाटील, माजी आमदार, विरोधी आघाडीचे नेतेसध्या साखर कारखानदारी अडचणीतून जात आहे. शेतकऱ्यांना ‘एफआरपी’प्रमाणे पैसे देताना दमछाक होत आहे. भोगावती कारखान्याची स्थितीही नाजूक आहे. अशा स्थितीत वाढीव कर्मचाऱ्यांना पगार देणे परवडण्यासारखे नाही. त्यामुळे नोकरभरतीला यापूर्वीही विरोध होता. तो आजही कायम आहे. -हसन मुश्रीफ, आमदार, सत्तारुढ राष्ट्रवादीचे नेतेनोकरभरतीसाठी पत्रे दिली आहेत हे खरे आहे; पण कारखान्यात काही कर्मचारी निवृत्त झाल्याने रिक्त झालेल्या सुमारे ४०० जागांवरच ही भरती केली आहे. कारखान्यात गेली पाच वर्षे हंगामी म्हणून सेवेत असणाऱ्या या कर्मचाऱ्यांनाच कायम सेवेत घेतले आहे; पण यासाठी कारखान्यावर किरकोळ प्रमाणातच आर्थिक बोजा पडणार आहे. -एस. एस. पाटील, कार्यकारी संचालक, ‘भोगावती’पाच महिन्यांपूर्वीच भोगावती कारखान्यास नव्याने नोकरभरती करू नये, असे लेखी कळविले होते. नव्याने नोकरभरती होत असल्याच्या चर्चेने आमचे लेखापरीक्षक कारखान्यावर तळ ठोकून त्याबाबत माहिती घेत आहेत; पण नव्याने भरतीच्या आॅर्डर कोणाला दिल्या असतील तर त्याची मला काहीही माहिती नाही. आमचे लेखापरीक्षक अहवाल देतील. त्यानंतर कारवाई करू. -सचिन रावळ, प्रादेशिक साखर सहसंचालक