शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

आॅनलाईनमुळे चार कोटी महसूल

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

महावितरण : रांगेत राहून बिल भरण्यापेक्षा आॅनलाईनकडेच अधिक कल

रत्नागिरी : रांगेत राहून वीजबिल भरण्यापेक्षा घरबसल्या इंटरनेटव्दारे वीजबिल भरणे सोपे झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक मंडळी नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे तसेच विविध शहरात किंवा परदेशात स्थायिक आहेत. अशा मंंडळींना दरमहा वीजबिल भरण्यासाठी कोणावर अवलंबून न राहता, घरबसल्या वीजबिल भरणे शक्य होत आहे. मे व जूनमध्ये जिल्ह्यातील २७ हजार ७३६ ग्राहकांनी लाभ घेतल्यामुळे ४ कोटी ३५ लाख ८ हजारांचा महसूल प्राप्त झाला आहे.रत्नागिरी जिल्ह्यात घरगुती ग्राहक ४ लाख १६ हजार ८८६, वाणिज्यिक ग्राहक ३१ हजार ४२३, औद्योगिक ग्राहक ५५४७, कृषिपंप १५ हजार ५५२, सार्वजनिक पाणीपुरवठा २२६०, पथदीप १३५५, तर इतर ३२४९ ग्राहक आहेत. महावितरणने ग्राहकांना आॅनलाईन वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याप्रमाणे महावितरणच्या संकेतस्थळावरून ग्राहक नंबर घालून आॅनलाईन वीजबिल पाहणे सुकर झाले आहे. अनेक ग्राहक आॅनलाईन वीजबिल पाहून त्याची प्रिंट काढून इंटरनेटव्दारे भरत आहेत. दिवसेंदिवस आॅनलाईन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली आहे. मे महिन्यामध्ये एकूण १३ हजार ४२३ ग्राहकांनी वीजबिल आॅनलाईन पध्दतीने भरल्यामुळे २ कोटी ७ लाख ४४ हजार १९० रूपयांचा महसूल जमा केला आहे. जूनमध्ये ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली आहे. १४ हजार ३१३ ग्राहकांनी आॅनलाईन वीजबिल भरल्यामुळे २ कोटी २७ लाख ६३ हजार ८१० रुपयांचा महसूल जमा केला आहे. मे व जून महिन्यात चिपळूण विभागातील एकूण ८००५ ग्राहकांनी आॅनलाईन वीजबिल भरल्यामुळे १ कोटी ६३ लाख ५ हजार ६९५ रूपयांचा महसूल जमा केला आहे. खेड विभागातील एकूण ४ हजार ७४३ ग्राहकांनी याचा लाभ घेतल्यामुळे एक कोटी ५१ लाख ४ हजार ९६५ रूपये, तर रत्नागिरी विभागातून १४ हजार ९८८ ग्राहकांनी २ कोटी २३ लाख ५७ हजार ३४० रूपयांचा महसूल महावितरणकडे जमा केला आहे. आॅनलाईन वीजबिल भरण्याच्या सुविधेचा चिपळूण विभागातील शहरी भागामध्ये एकूण ३२४१ ग्राहकांनी लाभ घेतल्यामुळे ५३ लाख ३९ हजार ३४० रूपयांचा महसूल जमा केला आहे. याच विभागातील गुहागरमधून २७३६ ग्राहकांनी २१ लाख ३ हजार २२० रूपये, तर रत्नागिरी विभागातील शहरी भागातील ५४६८ ग्राहकांमुळे १ कोटी ५ लाख ६२ हजार ३०० रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. मे महिनाजून महिनाविभागग्राहकउत्पन्न ग्राहकउत्पन्नचिपळूण४०२८५२२७५६५३९७७५४०८१३०खेड२२८६४९६७४२५२४५७५५४७५४०रत्नागिरी७१०९१०५४९२००७८७९११८०८१४०एकूण१३४२३२०७४४१९०१४३१३२२७६३८१०आॅनलाईन वीजबिल सुविधेचा फायदा ग्राहकांना होतोय. जिल्हाभरातील ग्राहकांकडून महसूल जमा. महावितरणचा हा प्रयोग लाभदायी ठरल्याचा दावा. महसुलात वाढ.