कोल्हापूर : ‘हॅलो, पाहुणे आताच निघालेत बरं का? दक्ष रहा,’ असा मॅसेज सर्व शासकीय कार्यालयांत पोहोचविण्याचे काम एक यंत्रणा करत आहे. ही यंत्रणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालया-खाली असलेल्या शहर भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत आहे. गाडी निघाली की, ‘पाहुणे गेले’, ‘ट्रॅप करून परत आले की पाहुणे जेवण करून आले...’असा मॅसेज पुरविला जातो. अवघ्या सहा महिन्यांत १५ लाचखोर अधिकाऱ्यांवर कारवाई करून ‘याच पाहुण्यां’नी आपला हिसका दाखवून सर्व शासकीय कार्यालयांवर आपला वचक ठेवला आहे. महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, आरटीओ, नगर भूमापन, बँका, रजिस्टेशन, अन्न व औषध प्रशासन आदी कार्यालयांत कामाच्या मोबदल्यात लाच स्वीकारणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सहा महिन्यांत १५ गुन्हे दाखल करून २० जणांना अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या राज्यातील आठ परिक्षेत्रांमध्ये एकमेव पुणे परिक्षेत्रातील कोल्हापूर विभागाचा कारवाईचा टप्पा सर्वाधिक आहे. गेल्या पाच वर्षांत ३३ गुन्हे न्यायालयीन निकाली होऊन आरोपींना शिक्षा झाली आहे, तर ९७ प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.
१५ लाचखोर चतुर्भुज : लाचसंबंधी ९७ प्रकरणे न्यायप्रविष्ट
By admin | Updated: July 14, 2014 01:12 IST