तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सुधाकर चौधरी
महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष म्हणून माजी पोलीस पाटील सुधाकर चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सभेला गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. काही ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामस्थांच्या व्यथा मांडल्या. त्यात प्रामुख्याने प्रशांत पाटील, निरंजन तायडे, प्रमोद उन्हाळे आदींनी चर्चेत भाग घेतला. सभेसाठी महिला ग्रा.पं. सदस्या आशा पाटील, साधना कोळी, वर्षा पाटील, उपसरपंच नारायण पाटील, ग्रा.पं. सदस्य व माजी सरपंच श्रीकांत महाजन, नितीन महाजन, तसेच ग्रामस्थ अरुण पाटील, सिद्धार्थ तायडे, योगेश्वर कोळी, भागवत कोळी, रवींद्र सोनवणे, माजी सरपंच गंभीर उन्हाळे, पंडित उन्हाळे, रामकृष्णा कोळी, शेख अकील, रघुनाथ कोळी, तसेच आरोग्य सेवक सुरेश तायडे, सर्व आशा वर्कर्स जिप शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, डॉ. शिवराज पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय धांडे, डॉ. शीतल चौहान उपस्थित होते.