शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

राज्य महामार्ग अतिक्रमणधारकांनी व्यापला

By admin | Updated: February 15, 2017 00:22 IST

अमळनेर : 14 मीटर रुंदीचा रस्ता झाला 6 मीटरचा, रस्ता मोकळा करण्यासाठी प्रय} करण्याची गरज

अमळनेर : शहरातून  जाणा:या राज्य महामार्गाची कागदोपत्री रुंदी 14 मीटर आहे. मात्र या महामार्गावरच अतिक्रमण झालेले असल्याने, रस्त्याची रुंदी अवघी 6.10 मीटर  झालेली आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिका यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने, अतिक्रमण कोणी काढावे हा प्रश्न निर्माण झाला असून, त्याचा त्रास सर्वसामान्यांना होतो. पन्नालाल चौक ते बोरी नदीच्या पुलार्पयत वाहतुकीची होणारी कोडी एक जटिल समस्या झालेली आहे.अमळनेर शहरातून मेहेरगाव (धुळे)-खरगोन हा राज्य महामार्ग जातो. गेल्या काही वर्षापासून या महामार्गावर अवजड वाहतूक मोठय़ा प्रमाणावर वाढलेली आहे. त्यातच वाळूची वाहनेही मोठय़ा प्रमाणात जात असतात.पूर्वी बसस्थानक ते पैलाडर्पयत मोठय़ा प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत होती. त्यामुळे माजी आमदार साहेबराव पाटील यांनी प्रय} करून रस्त्याचे रुंदीकरण, दुभाजक टाकून तसेच मुख्य फरशी पूल नव्याने बांधून रुंद करण्यात आला. तसेच संत सखाराम महाराज समाधीस्थळाजवळ पैलाड ते किल्ला चौक व गांधलीपुरा ते पैलाड वीटभट्टय़ा असे दोन पूलही मंजूर करण्यात आले. मुख्य पूल वाहतुकीसाठी खुला झाला. तरीही बसस्थानक ते पैलाडदरम्यानची वाहतूक कोंडी सुटलेली नाही. उलट ती वाढतच आहे.आर.के.नगर ते पैलाडदरम्यान असलेल्या राज्यमार्गाची रूंदी कागदोपत्री 14 मीटर आहे. प्रत्यक्षात मात्र रस्त्याची रूंदी 6.10 मीटरच भरते. याच रस्त्यावर ऐतिहासिक दरवाजा, आणि धार्मिक स्थळे आहेत. तसेच या रस्त्यावर रहिवासी व दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. परिणामी दगडी दरवाजा ते फरशी पुलार्पयत वाहने नेताना चालकांना कसरत करावी लागते. वाहतूक नियंत्रणासाठी येथे पोलिसांची नियुक्ती केलेली असली तरी, चिंचोळ्या रस्त्यांमुळे वाहतूक सुरळीत करताना पोलिसांनाही नाकीनऊ येते.वाहतुकीला पर्याय म्हणून पन्नालाल चौक ते सुभाष चौकदरम्यानचा रस्ता रूंद करण्यात आला होता. या मार्गावरून काही दिवस वाहतूकही झाली. मात्र याच रस्त्यावर हातगाडीधारकांनी व दुकानदारांनी साहित्य ठेवल्याने, या रूंद रस्त्यावरून चालणे कठीण झालेले आहे. त्यामुळे पर्यायी मार्गही बंद होऊन वाहतूक मुख्य राज्य मार्गावरूनच सुरू आहे.वाहतुकीच्या कोंडीमुळे अनेकदा विद्यार्थी, नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतो. पुलाचे काम धिम्यागतीनेबोरी नदीवर गांधलीपुरा भागाकडे उभारण्यात येणा:या पुलाचे कामही धिम्यागतीने सुरू आहे. मात्र या पुलाच्या बांधकामासाठी मे 2018 र्पयत मुदत असल्याने, त्या दृष्टीने काम सुरू आहे. अर्थसंकल्पातील हे काम असून, दोन कोटीर्पयत आतार्पयत खर्च झालेला आहे. उर्वरित पाच कोटींचा निधी मिळणे बाकी आहे.या पर्यायी मार्गावरदेखील काही घरे आहेत. तेथूनही वाहतूक सुरळीत होऊ शकणार नाही. वाहतुकीसाठी तीन पूल जरी बांधण्यात आले असले तरी त्या पुलांच्या मार्गावरील शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची सांगड बसणे गरजेचे आहे.या भागातील वाहतुकीचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. त्यासाठी पालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी संयुक्तपणे प्रय} करण्याची गरज आहे          .(वार्ताहर)नागरिकांना, प्रवाशांना ख:या अर्थाने वाहतुकीच्या कोंडीतून सोडवायचे असेल तर लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन शहरातील रस्त्यावरचे अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेणे गरजेचे आहे. यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याची गरज आहे.पन्नालाल चौक ते फरशी रोड दरम्यानच्या अतिक्रमण-धारकांना नोटिसा दिल्या आहेत. मात्र न.पा.च्या उता:यावर त्यांची नावे असून त्यांना अधिकृत वीज कनेक्शनही देण्यात आल्याने अडचण येत आहे.-नवनाथ सोनवणे, सहायक अभियंता, सा.बां.विभाग, अमळनेर