यावेळी नाभिक समाज सभागृहाचे भूमिपूजन जिल्हाध्यक्ष रवींद्र नेरपगारे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नाभिक महामंडळ महिला प्रदेशाध्यक्षा भारती सोनवणे होत्या.
संत सेना महाराज नाभिक समाज विकास मंडळाच्या वतीने संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त मंडळाचे अध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते विधिवत पूजन करून स्थापना करण्यात आली. पुण्यतिथीनिमित्त लक्ष्मण खैरनार यांच्या श्रीराम भजनी मंडळाचा कार्यक्रम घेण्यात आला.
दुपारी संताची सामूहिक आरती झाली. नंतर माजी उपाध्यक्ष पोपटराव नेरपगारे व शिक्षक विक्रम सोनवणे यांनी सेना महाराज जीवन चरित्रावर तर योगेश चित्ते यांनी समाज कार्याविषयी माहिती दिली. यानंतर नाभिक समाज सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोहर खोंडे, महिला जिल्हाध्यक्ष संगीता गवळी, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बहाळकर, जिल्हा सचिव कुमार श्रीरामे, राज्य कार्यकारणी सदस्य सुनील बोरसे, खोंडे ज्वेलर्सचे संतोष खोंडे (जळगाव), राजकुमार गवळी, रवींद्र शिरसाठ, सेवानिवृत्त पीएसआय संभाजी वेळीसकर, रामभाऊ गागुर्डे (एरंडोल), किशोर वाघ, संजय सोनवणे (जळगाव), गणेश सोनवणे, दीपक सोनवणे (चाळीसगाव), नरेश गर्गे, योगेश चित्ते (पाचोरा) आदी उपस्थित होते.
सभागृह भूमिपूजनानंतर झालेल्या कार्यक्रमात भडगाव येथील नाभिक समाज कार्याचे कौतुक करत नाभिक समाज सभागृह बांधकामास सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन उपस्थित मान्यवरांनी दिले.
प्रास्तविक अध्यक्ष संजय पवार तर सचिव हिलाल नेरपगार यांनी अभार मानले. यशस्वीतेसाठी अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष भरत चव्हाण, सचिव हिलाल नेरपगार, खजिनदार विजय ठाकरे, काशीनाथ शिरसाठ, शिवाजी शिरसाठ, प्रभाकर नेरपगार, राजू महाले, सुभाष ठाकरे, नीलेश ठाकरे, राजेद्र सोनवणे, गोरख वेळीस, कैलास चव्हाण, सूर्यभान वाघ, बबलू पवार, विजय चव्हाण, भास्कर पवार यांच्यासह सर्व समाजबांधवांनी परिश्रम घेतले.