ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 31 - सगळय़ात आधी आपण कोल्हेकुईची वैशिष्टय़े बघू. म्हणजे बघा, वाघ-सिंह डरकाळी फोडतात, त्यामागे त्यांचा एक इशारा असतो; आता आम्ही हल्ला करणार आहोत. गाय हंबरते, ती वासराला बोलावण्यासाठी, मोराचा केकराव पावसाची सूचना देतो. कुत्रा भुंकतो, तोसुद्धा मालकाला सावध करण्यासाठी. या सगळय़ांच्या ओरडण्यामागे काहीतरी समजण्यासारखा हेतू असतो. पण कोल्हेकुई मागे कसलाच हेतू नसतो, ते आपले ओरडायचे म्हणून ओरडतात. सावरकर जयंती आणि पुण्यतिथीला त्यांच्या तथाकथित ‘माफीनाम्या’वरून अशीच निरुद्देश कोल्हेकुई न चुकता होत असते. आतार्पयत फारशी जाणवत नव्हती, कारण आतार्पयत सावरकर हे ‘गव्हर्नमेंट रेकग्नाईज्ड’ शत्रू होते. त्यांच्याबद्दल कधी, कुठे चांगलं लिहिलं जात नसे. लिहिलं तर ते छापलं जात नसे. त्यामुळे ‘अकथित सावरकर’ नावाने वेगळं पुस्तक काढायची जरुरी नव्हती. पण आता तशी परिस्थिती नाही. देशाचे पंतप्रधान आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आता सावरकरांचं मोठेपण जाहीरपणे सांगतात, त्याला प्रसिद्धी मिळते. त्यामुळे आता हा ‘माफी’ चा मुद्दा आवजरून, पुन्हा पुन्हा उकरून काढला जातो आणि तो बहुदा इतिहासाची, कागदपत्रांची माहिती न घेता वटवट करणा:यांकडूनच उकरला जातो. त्याला सप्रमाण उत्तरं देणारे, प्रतिवाद करणारे बहुदा अभ्यासू लेखक असतात. त्यांची भाषा शिवराळ नसते, उथळ नसते. त्यामुळे त्यांचे वाचक मर्यादित राहतात. तरीही या तथाकथित ‘माफी’ मागचं ऐतिहासिक सत्य काय आहे, ते अनेक अभ्यासकांनी आतार्पयत समोर आणलंय. त्याबद्दल पुन्हा इथे लिहिणं गरजेचं नाही.पण या ‘माफी’ निमित्ताने एक गोष्ट समोर आल्याशिवाय राहात नाही. अनेकदा सावरकरांचा द्वेष करणा:या लोकांनी त्यांच्याबाबत कसे दुहेरी मापदंड वापरलेत, ते बघण्यासारखे आहेत. मुळात, सावरकर क्रांतिकारक होते, तसे मुत्सद्दी राजकारणीही होते. इथे आजच्या काळातला शरद पवारांसारखा मुरब्बी राजकारणी जेव्हा एखाद्याचं तोंड भरून, जाहीरपणे कौतुक करतो तेव्हा पुढे त्यांचं काय होणार आहे, याचा भल्याभल्यांना अंदाज येत नाही. राजकारणातल्या व्यक्तीचे शब्द आणि कृती एकमेकांना पूरक असतील, असं काही नाही- किंबहुना नसतातच. एकदा एखाद्याला तुम्ही शत्रू मानलंत, की मग त्याच्याशी वागताना, बोलताना ‘राजा हरिश्चंद्र’ हा तुमचा आदर्श असूच शकत नाही. अन्यथा तुम्ही केव्हाच नेस्तनाबूत होऊन जाल. शत्रूशी वागताना ‘माफी’ या सारखी फसवी, दिशाभूल करणारी गोष्ट तर दुसरी कोणतीच नाही. खोटं वाटतंय? पटत नाही? मग जरा महाराजांचं चरित्र वाचा. शहाजीराजे कैदेत पडले, त्यांना सोडवताना शहाजहानची, खुद्द आदिलशहाची, अफजलखानाची, पन्हाळय़ाच्या वेढय़ाच्या वेळी सिद्धी जाैहरची, मिङराराजे जयसिंगांची, आग्राहून निसटून आल्यावरसुद्धा पुन्हा औरंगजेबाची..या सगळय़ांची महाराजांनी वेळप्रसंग बघून बिनदिक्कत, लेखी पत्रे पाठवून, माफी मागितली. आणि नंतर त्यांच्यावर योग्य वेळी मात केली. आलमगीर औरंगजेब हा आजच्या बिनबुडी विचारवंतांसारखा बिनडोक नव्हता, अत्यंत धूर्त होता. त्याला या माफीचा खरा अर्थ तेव्हाच लक्षात आला होता. पण तरीही राजकारणाची गरज म्हणून त्याने उदारपणाचा आव आणून ती माफी ‘स्वीकारली’ही होती. हा शहाणपणा दुर्दैवाने पृथ्वीराज चौहानाकडे नव्हता. त्यामुळे त्याने शहाबुद्दीन घोरीच्या ‘माफी’वर आंधळा विश्वास ठेवला आणि..!गंमत म्हणजे सावरकरांच्या ‘माफी’ वर खुद्द इंग्रज सरकारने तरी विश्वास ठेवला होता कां? अजिबात नाही. लक्षात घ्या, सावरकर चार-दोन दिवसांमध्ये अंदमानमधून परत आलेले नाहीत. दहा वर्षानंतर आले. तेही अनेक अटी निर्बाधांसह आले. इंग्रज सरकारला सावरकरांच्या तथाकथित ‘विनंती’ मागचा खरा अर्थ व्यवस्थित समजला होता. तो समजला नाही तो, त्यांच्याच देशबांधवांना! हे जे टीकाकार आहेत, ते अशा थाटात खिल्ली उडवतात; की जसं काही सावरकरांनी अंगाला जराही तोशीस लागू न देता अलगद माफी मागून सुटका करून घेतली. अंदमानात दहा वर्ष कशी काढतात, हे तरी माहिती आहे? ज्यांची मुलं, सुना, जावई, आतेबहिणी, मावसभाऊ.. सगळे अमेरिकेत असतात आणि नरडं सुकेर्पयत जे अमेरिकेचीच तारीफ करत जगतात, त्यांनी सावरकरांच्या देशप्रेमाबद्दल बोलावं? चर्चासत्रात भाग घ्यायला जाताना फस्र्ट ए.सी.शिवाय कधी प्रवास न करणा:या आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्येच उतरणा:या ‘निर्भिड पत्रकारांनी’ सावरकरांच्या हालअपेष्टांची चेष्टा करावी? त्यांना ‘माफीवीर’ म्हणावं? माझा एक शेतकरी मित्र म्हणतो- ‘जाऊ द्या ना भाऊ! दुतोंडी गांडूळं जिमिनीला पोखरत राहता, पन त्येच्याने धरणीकंप येतू का? उलटी मशागत होते बगा जिमिनीची..’ अगदी खरं आहे त्याचं. गेल्या दिवसांमध्ये ‘सावरकर’ या विषयाची चांगली मशागत झालीय, यात शंकाच नाही.- तेव्हा, कोल्हेकुईला मन:पूर्वक धन्यवाद . - अॅड. सुशील अत्रे
सावरकर, माफी आणि कोल्हेकुई
By admin | Updated: May 31, 2017 18:26 IST