शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सायकल

By admin | Updated: July 17, 2017 13:05 IST

नकळत मागचे कॅरियर सोडून द्यायचे असते! पण कितीही आणि काहीही केले तरी ढोपर किंवा गुडघा फुटल्याशिवाय सायकल येत नसते!

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 17 -आजकाल रस्त्यावर सायकल फार कमी दिसते आणि इंधन दुचाकी जास्त. कॉलेजच्या शेवटच्या वर्षार्पयत आणि स्थानिक नोकरीतील पहिली दोन-तीन वर्षे मी सायकलच वापरली. आता त्यावर विश्वास बसत नाही. हा वेगाने बदलणा:या वेळेचा परिणाम आहे. लवकर, आणखीन लवकर- अशी जी स्पर्धा आहे, त्यात सायकलवर कसे बसणार? आहे असे; पण सायकलची दोन चाके आणि पॅडल्स् जोर्पयत पाय आहेत तोर्पयत राहणारच! ते एक बरे आहे.. सायकलचे चित्र काढताना अनेक विचार मनात येत होते. त्यातील प्रमुख ‘सायकल मला कोणी शिकविली?’ आता ते आठवत नाहीये. पण एक स्पष्ट आठवते ते की, मी लहान बहिणीला मागे कॅरियरला धरून धावत-धावत शिकवली होती. तीन-चार दशके या गोष्टीला उलटून गेलीत, पण तिला त्याची आठवण आहे आणि अनेकदा त्याचा उल्लेख ती करते! सायकल शिकवणे गमतीचे असते! मागे आपल्या कोणीतरी आहे, याची काळजी मिटवणारी सुखद जाणीव असते. मग सराव झाला आणि मागे कोणीच नाही, असे जेव्हा दिसते तेव्हाचा आनंद गगनात मावणारा नसतो! मागचा तो काळजीवाहू ही कला जाणून असतो की, नकळत मागचे कॅरियर सोडून द्यायचे असते! पण कितीही आणि काहीही केले तरी ढोपर किंवा गुडघा फुटल्याशिवाय सायकल येत नसते!सायकलसारखे यंत्र आणि स्वत:ची असलेली शक्ती असे दुसरे कोणतेच सुरेख कॉम्बिनेशन नाहीये. मस्त सायकल असते पण ती वेगाने किंवा रमत-गमत चालवण्यासाठी पायडल्स् मारावेच लागतात. बटन- स्टार्ट केली आणि सायकल चालू होऊन ती आपसूक आपल्याला घेऊन धावायला लागली, असे होत नसते. ती दोन चाके, बसायला सीट, मागच्या चाकाला गतिमान करणारी ती ऑईल लावलेली चेन आणि तिला जोडलेली दोन पायडल्स् हे डिझाईन ज्याने कोणी पूर्वी शोधले, त्याला सलाम केला पाहिजे.सायकल कोठेही चालवत नेता येते. तिला स्टँडवर लावले की पार्किगचा प्रश्न मिटला. सायकल सवारी अशा जागी नेते जिथे आधी कोणीही गेलेले नसते. सायकलिंग करणे म्हणजे बॅलन्सिंग. तिची दोन चाके जोर्पयत धावतात तोर्पयत ते होते! हे म्हणजे अगदी आपल्या आयुष्यासारखेच! सायकल चालवणे सोप्यातली सोपी गोष्ट असते आणि ती सहजता म्हणजे निखळ आनंदच! ती किणकिण वाजणारी उजव्या हाताशेजारची घंटी, स्पोक्समधले ते मणी, हँडलच्या दोन्ही बाजूला ङिारमिळ्या असलेली ती रंगीत कव्हर्स, जिथे जमेल तिथे केलेले रंगीत वायरिंग आणि ते मागच्या चाकाच्या मडगार्डला लावलेले विशिष्ट आकाराचे रबर! त्यावरचे संदेश हे स्वतंत्र प्रकरण आहे! ‘संभाल के चल प्यारे- जिंदगी अनमोल है’ असे भारदस्त वाक्य पेंट केलेले रबर मला अजून आठवते आणि हा संदेश कोणासाठी ते अजूनही समजलेले नाही!! हँडलवर आपले नाव ठळकपणे टाकण्याचीही प्रथा होती! सायकलने फार आनंद दिला आहे. काढली सायकल की चालले कोठेही! परत एकदा जर खरोखर बालपण अनुभवायचे असेल तर सायकलिंग मस्ट.. त्यासारखे दुसरे काही नाही! सायकलबाबत आपल्याशी बोलताना ती ‘टूर दी फ्रान्स’ विसरून कसे चालेल? अहाहा! जगप्रसिद्ध सायकलचे आणि फिटनेसचे महत्त्व जगाला दाखवून देणारा वार्षिक जल्लोष म्हणजे ही स्पर्धा. तो रम्य निसर्ग, ती जीवाच्या आकांताने असलेली जिंकण्याची ईर्षा, ते कठीण चढाव, ते प्रेक्षक आणि हो- तो हीरो- लान्स आर्मस्ट्राँग! नंतर त्यावर संदेह घेतले गेले ते एक सोडा.. सायकल चालवणे आणि त्यायोगे शरीरावरील चरबी कमी करणे हे आज शहरात अनेक सायकलिस्टच्या रूपाने दिसते आणि तसे ते दिसणे फारच चांगले आहे. ते वेड जेवढे वाढेल, तेवढे सायकल चालवणारे वाढतील. नको ते पेट्रोल-डिङोल आणि तो नाकातोंडात जाणारा धूर. अनेक शहरे अशी आहेत जिथे रस्ता असा बांधला गेलेला असतो, ज्या योगे सायकल चालवणे सोपे आणि सुरक्षित होईल.सायकलचे चित्र काढताना आधी कधी आठवले नव्हते, ते आठवले. आमच्या शाळेच्या मोठय़ा मैदानावर वेळ मिळेल तेव्हा आम्ही सायकली चालवत असू. पाटीवर पेन्सील किंवा कागदावर पेन- त्याप्रमाणे चालवून झाल्यावर त्या मैदानाच्या कॅन्व्हासवर धावणा:या टायर्सच्या खुणांचे एक सुंदर डिझाईन तयार झालेले असे. मॉडर्न आर्ट! जसे हवे तसे आकार दाखवणारे! भूमी-चित्र! मला ते आठवले! सायकलबाबत बोलतोच आहोत तर एक गमतीची गोष्ट सांगण्याचा मोह मला होतो आहे. एका सायकलस्वाराने पादचा:याला चुकून मागून धडक दिली. असे होते कधीकधी. मात्र, भांडण नेहमीचेच ठरलेले असते, तसे ते झालेच. बघे जमले. सायकलवाल्याने माफी मागून झाली होती. पण भांडण थांबत नव्हते. इतक्यात गर्दीतून एक जण त्वरेने पुढे आला. त्याने थोडेफार लागलेल्या त्या पैदल माणसाच्या कानात काही सांगितले. ते ऐकून हा हसला.त्याने आभाळाकडे बघत हात जोडले आणि निघून गेला. हे सारे सायकलस्वारास समजेना काय चालले आहे! त्याने शेवटी गर्दी अर्थातच पांगल्यावर त्या भांडण मिटवणा:यास विचारलेच! काय जादू केली मित्रा? गर्दीतून अचानक अवतीर्ण झालेला तो माणूस म्हणाला- ‘अरे वाचलास बाबा तू.. हा सायकलस्वार बस चालवतो!’ असे मी त्याच्या कानात सांगितले!! असो! माङो सायकल चालवणे आपणास भेटून संपलेले आहे. सायकलचे चित्र काढताना आणि त्यावरची रपेट घेताना मी घामाघूम झालेलो आहे! तसा तो झालेला असताना, मला हे समजत नाहीये की अगदीच फार रुळलेला सायकलसाठीचा मराठीतील काय प्रतिशब्द आहे?!- प्रदीप रस्से