अमळनेर : जळगाव जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसतर्फे निषेध करण्यात येऊन दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली.
प्रा. हितेश पाटील त्यांच्यावर याच गटातील जिल्हा परिषद सदस्य पती रामदास पाटील व त्यांचा मुलगा शुभम पाटील यांच्याकडून वारंवार हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न होत आहे. १८ रोजी बोदवड शहरातील जुन्या तहसील कार्यालयाच्या परिसरात असताना त्यांची गाडी अडवत हल्ला करण्याच्या उद्देशाने गाडीवर थापा मारल्या. या संदर्भात पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी हर्षल जाधव, महेश पाटील, तौसिफ तेली, माजी युवक काँग्रेस शहराध्यक्ष सईद तेली, शहर कार्याध्यक्ष कुणाल चौधरी, शहर उपाध्यक्ष शाहीद तेली, अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष राजू भाट, आदी पदाधिकारी उपस्थित होते.