Maharashtra Election 2019: If opposition is not left, then why need Modi, Shah's meetings? - Jayant Patil | Maharashtra Election 2019 : जर विरोधकच उरले नाहीत तर मोदी, शहांच्या सभांची गरज काय? - जयंत पाटील
Maharashtra Election 2019 : जर विरोधकच उरले नाहीत तर मोदी, शहांच्या सभांची गरज काय? - जयंत पाटील

जळगाव : मुख्यमंत्र्यांना जर राज्यात विरोधकच दिसत नसतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० सभा, अमित शहांना ३० सभा आणि मुख्यमंत्र्यांना १०० सभा घेण्याची गरज काय? असा सवाल राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
निवडणुकीनंतर शरद पवार यांचे राजकारण संपलेले असेल, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या केले आहे. यावर पाटील म्हणाले, चंद्रकांत पाटील हे पुरात पुण्याला वाहून आलेले उमेदवार आहेत. वाहून आलेला उमेदवार नको, अशी पुण्यातील मतदारांची भूमिका आहे. सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्ष व शरद पवार नावाची भिती वाटतेय. म्हणून प्रत्येक सभेमध्ये अमित शहा हे पवार व राष्टÑवादीला टार्गेट करीत आहेत, असे पाटील म्हणाले.
राज्यासोबतच केंद्र सरकारही आर्थिक संकटात आहे, त्यातून खाजगीकरणाचा मार्ग अवलंबला जात आहे. बीएसएनएल व एमटीएनएलचे गेल्या दोन वर्षांपासून जिओसाठी खच्चीकरण सुरू आहे. सरकारने रेल्वेचे बजेट केंद्रीय अर्थसंकल्पात समाविष्ट केले. रेल्वेसाठी किती निधी खर्च करताय? ते जनतेला समजतच नाही, असे ते म्हणाले.

Web Title: Maharashtra Election 2019: If opposition is not left, then why need Modi, Shah's meetings? - Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.