शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
7
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
8
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
9
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
10
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
11
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
12
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
13
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
14
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
15
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
16
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
17
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
18
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
19
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
20
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?

काक-स्पर्श

By admin | Updated: July 3, 2017 13:48 IST

सोबत जे स्केच आहे त्यात एक बसलेला माणूस कॉपी केला आहे. वासुदेव कामत यांचे मनापासून आभार) हा पाठमोरा आहे, निवांत वाटतो आहे आणि निजर्न जागी बसला आहे.

 सोबत जे स्केच आहे त्यात एक बसलेला माणूस कॉपी केला आहे. वासुदेव कामत यांचे मनापासून आभार) हा पाठमोरा आहे, निवांत वाटतो आहे आणि निजर्न जागी बसला आहे. त्याच्यामागे कावळे दिसतात. हे रेखांकन  करत असताना मी आईच्या काकस्पर्शासाठी आम्ही करत असलेल्या प्रतीक्षेचा आठव करत होतो. या रुढी असता, त्या पाळाव्या लागतात. कावळा काही केल्या येत नव्हता. अशाप्रसंगी मनात काही बोलतात. झाडावर दूर एक कावळा होता, तो उडून गेला. पेशन्स ठेवावे लागत  होते. ब:याच वेळाने लांबून कोणीतरी पाठवल्यासारखा एक आला आणि त्याने अन्न चाखले. हा कां आला असावा, याचा मी चित्र काढताना विचार करत होतो. 

आता चित्राचा दुसरा भाग बघूया. त्यात 1 हा अंक सहज समजेल. त्यातच काढलेली आनंद ही अक्षरे मात्र थोडे निरखून पाहिले की समजतील. आनंद हा माझा मित्र आहे. याने मला भेटल्यावर एक किमती भेटवस्तू दिली. हा जवळजवळ योगाचार्य आहे आणि एकदम फिट आहे. त्याचे नाव सहजच लिहिले गेले, त्याला एक (1) हा आकार दिला गेला. हे सारे नकळत घडले. 
मी मग नंतर ‘नंबर योगी’ असे लिहिले. नंतर चित्र लॅमिनेट केले. हे सारे घडले, तो परत नागपूरला जाण्याच्या दोन तास आधी. मी ही ‘माझी कलाकृती’ त्याला जेव्हा भेट दिली तेव्हा जाणूनबुजून त्याच्या चेह:यास निरखत होतो. मला स्पष्टपणे दिसले- त्याला अवचित मिळालेली ही भेट प्रचंड आनंद देणारी ठरली आहे.
आता आपण आनंद, मी सारे विसरू, बघा, कला काय-काय करू शकते? कष्ट घेण्याची जरुरी नाही. एका रेषेने मला दुस:या रेषेकडे नेले. कला प्रत्येकात वसते. आपण कालौघात ते विसरतो. एक साधे उदाहरण देतो. स्वच्छ हसणे आणि बोलणे ही कला प्रत्येकात असतेच. निव्र्याजपणे आपण कोणी भेटला तर त्याच्या बघताक्षणी आकषरून घेणा:या एखाद्या गोष्टीचे लगेच  कौतुक करू शकतो ना? त्याने दोघांनाही आनंद मिळतो. आता ही आपोआप घडणारी कृती, मोठी कला आहे. आपण ती विसरलो तर...
नव्वदीत आणि तरी ठणठणीत अशा माङया ओळखीच्या आई आहेत. कला विसरलेल्या नाहीत. आधी साडय़ा आणि आता हातरुमाल यात त्या दो:याने रंग भरतात! ‘ही माझी तुम्हाला भेट’ असे सांगत जेव्हा ती त्या देतात तेव्हा समोरची व्यक्ती आधी खाली वाकून त्यांना नमस्कार करते आणि नंतर भानावर  येते!
 आता या अचानक मिळालेल्या आशीर्वादाचे मोल करता येईल का? रेमंड्सची ब्लँकेटस् आणतो आपण, पण घरोघरी आजीची, आईची जुनी पातळे वापरून केलेली गोधडी जी उब देते ती त्या महाग ब्लँकेटस्मध्ये कशी आणणार? आणखीन एक..उफ्फ! हे पण जुनेच उदाहरण आहे! पण कालातीत आहे- ‘सुदाम्याचे पोहे!’ किंवा ती शबरी, तिची बोरे! वन नेव्हर फॉरगेटस् द् पर्सनल टच!
आत्ता मी येथे आपल्याशी खरे तर बोलतो आहे, पण हे स्वगत आहे. मीच माङो मला पटवतो आहे की, ‘क्रिएटीव्हीटी इज गिव्हींग युवरसेल्फ परमिशन टू सी थिंग्स डिफरंटली.’ त्यासाठी अॅक्शन हवी. कला असतेच, ती वापरावी. 
सिंपल. ‘बरे काय आहे’ आपले आपणात, ते कधीतरी माहिती होतेच. शेकडो कम्यनिकेशन्स आपण दररोज स्क्रिनवर बघतो. ‘मार्केट मे नया है’ असे म्हणत आपण जुनेच इकडे-तिकडे पाठवतो. आज एक करून बघू. आवडलेले असे काही किंवा सुचलेले, हाताने लिहून आणि त्याचा फोटो काढून सगळीकडे पाठवाल-बघा, काय होते!
‘का-वळा’ असा विचार न करता, मी काही मनात जसे आले तसे लिहिले. आपण ते हलक्याने आणि प्रेमाने घ्याल. कलायुक्त असे कोणासही जगता येते. तसे जे जगतात, त्यांच्यासाठी हे शब्द नव्हते. दुस:या अर्थाने, कलेला ‘काक-स्पर्श’ झालेला बरा या हेतूने मी लिहिले. - प्रदीप रस्से