जळगाव : राज्य सॉफ्टबॉल असोसिएशनच्या मान्यतेने पुणे जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनने आयोजित केलेल्या पुणेरी सॉफ्टबॉल लीगमध्ये जळगावच्या संघाने विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात जळगावच्या संघाने अहमदनगरवर १० होमरनच्या फरकाने विजय मिळवला. ही स्पर्धा नुकतीच पार पडली.
साखळी फेरीत जळगावच्या संघाने मुंबई, नागपूर, पुणे जिल्हा संघावर मात केली. या स्पर्धेत गौरव चौधरी बेस्ट पिचर, कल्पेश कोल्हे बेस्ट कॅचर आणि राज भिलारे बेस्ट शॉट स्टॉप ठरला. तर धीरज बाविस्कर याने बेस्ट हिटरचा पुरस्कार मिळवला. या संघात जयेश मोरे, सुमेध तळवेलकर, प्रीतिश पाटील, कल्पेश कोल्हे, कल्पेश जाधव, गौरव चौधरी, राज भिलारे, धीरज बाविस्कर, उमेश विसपुते, अनिकेत जाधव, कुणाल सपके, मोहित पाटील, सुमेध गाढे, सागर पाटील, श्रीराम चव्हाण, अभिजित सोनवणे यांचा समावेश होता. दोन वर्षांनी झालेल्या या स्पर्धेत जळगावच्या संघाने अजिंक्यपद मिळवले. त्याबद्दल पी. ई. पाटील, आमदार गिरीष महाजन, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, डॉ. प्रदीप तळवेलकर, प्रशांत जगताप, अक्षय येवले, अरुण श्रीखंडे, किशोर चौधरी, शंकर मोरे यांनी कौतुक केले आहे.