शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

अरे ओ, चमचा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 16:45 IST

लोकमतच्या वीकेण्ड पुरवणीमधील लेखिका नीता केसकर यांचा लेख शनिवार, दि. 26 ऑगस्ट 2017

तू माझं ऐक. तो त्यांचा चमचा आहे. प्रत्येक गोष्ट तो त्यांना सांगतो. अरे, नाही रे. तो तसा नाहीए. ऐक तर माझं. तुझा काहीतरी गैरसमज झालाय’, अशी शब्दावली आपण नेहमी ऐकतो. या वाक्याचा अर्थ भलेही वेगळ्या अर्थानं होत असेल किंवा तसे बोलले जात असेल. पण, मी मात्र अशी कोणतीही चमचेगिरी करणार नाहीए. कारण मी ‘चमच्याला’ धरून राहणार आहे. तो आहेच तसा. चमचेगिरी करणे हा त्याचा स्वभाव नाही. इतरांच्या मुखात घास भरवणे, हा त्याचा मूळ स्वभाव- ‘जेथे जातो, तेथे तू माझा सांगाती..!’ माणसाच्या हाताला इजा किंवा दुखापत झाली असेल, तर हा मदतीला धावून येणार, आणि स्वत:च्या हाताने पोटभर खाऊ घालणार. ‘चमचा’ आपल्या कामाशी प्रामाणिक असतो. मिठातला चमचा मिठात, लोणच्यातला चमचा लोणच्यात आणि दह्यातला चमचा दह्यात. याचाच अर्थ तो आपलं कार्यक्षेत्र सोडून इतरत्र भटकताना दिसणार नाही. ‘कामचोर’ असा याचा स्वभाव नाही. म्हणूनच सगळ्यांच्या गळ्यातला नाही, तर ताटातल्या ताटातच आहे. उजळ माथ्याने फिरत असतो हा. ‘चमचा’ नेहमी आपल्याला धरून राहतो. आपल्याला सोडून वागत नाही. चमच्याचे प्रकार किती? साधा चमचा- म्हणजे सर्वसाधारणपणे याचा उपयोग उपमा, कांदे-पोहे खाण्यासाठी होतो, तर दुसरा काटा चमचा- सर्वसाधारणपणे याचा मुक्काम जास्त करून आपल्याला हॉटेलमध्ये दिसतो. डोसा, इडली, उत्तप्पा यांचा जीवलग मित्र. तसं पाहता, याचा स्वभाव जरा स्वाभिमानी. ऐटीत बसणार. नम्र वागणे याला माहीतच नाही. त्या मानाने आमचा कांदे-पोहेचा ‘चमचा’ म्हणजे गोगलगाय. याचे पाय पोटात नसतात. बाहेरच असतात. तो न बोलून कसा शहाणा आहे, बघा हा! तो पालथा पडला, तर समजावं, आता तुमचं ‘डिशमधलं खाऊन झालंय. मला उठायला हरकत नाही आणि तो जर सरळ असेल तर अजून डिशमधले खायचे राहिले आहे. समोरची डिश उचलू नका. घरात बाळाला लावायला ‘काळी टिट’ नसेल, तर आई चटकन, चमच्याचा मागील भाग दिव्यावर धरते आणि ती काजळी बाळाच्या डोळ्यात लावते. बाळ आणि चमचा मस्त जमतं. बाळ रडत असेल तर बाळाची आई तो चमचा एखाद्या वाटीत वाजवते आणि तो चमच्याने झालेला नाद ऐकला की बाळाचं रडणं थांबतं अन् बाळच काय, घरातले सारेच खुदकन हसतात. प्रत्येक जण याला आपल्या घरी बोलवतात. आणि म्हणूनच मी आता या चमच्याला घेऊन जाणारे भजे गल्लीत कांदे-पोहे खाण्यासाठी येणार नं बाबा. अजिबात नाही. लोक मला ‘चमचा’ म्हणतील. म्हणू देत. तू चमचेगिरी नाही करत, तर उत्तम कामगिरी करतोस. चल!