भुसावळ : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना धोका आहे. तो टाळण्यासाठी हे लसीकरण करण्यात येत आहे. १२ रोजी सकाळी १० वा पालिका रुग्णालयात या लसीकरणाचे उद्घाटन आरोग्य सभापती प्रा. दिनेश राठी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, मुख्याधिकरी संदीप चिद्रवार, नगरसेवक युवराज लोणारी, न.पा. दवाखाना वैद्यकीय प्रमुख डॉ. कीती फलटणकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. तौसिफखान उपस्थित होते.
पहिल्या दिवशी लसीकरणासाठी १५० डोस आले होते. त्यांचे वितरण न.पा. दवाखान्यासह उपकेंद्रांवर करण्यात आले. पहिल्या दिवशी संपूर्ण १५० डोस शून्य ते एक वर्षआतील बालकांना देण्यात आले. बालकांमधील कोरोना व न्यूमोनियाची शक्यता पाहता त्यांचा धोका कमी करण्यासाठी यापूर्वी खाजगी दवाखान्यात उपलब्ध असलेली न्यूमोकोकल कॉनज्यकेट व्हॅक्सिन (पीसीव्ही)ची आता पहिल्यांदा पालिका रुग्णालयात उपलब्ध करण्यात आली आहे.