शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

गरजांनी हिरावून नेलं गावाचं सुख -समाधान : ओलावा आटतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 17:37 IST

‘लोकमत’च्या ‘मंथन’ पुरवणीत ‘गाव पांढरी’ या सदरात लिहिताहेत साहित्यिक रवींद्र पांढरे....

धुणं धुवायला गृहिणी नदीवर निसर्गाच्या सान्निध्यात जायच्या. आता गरजा वाढल्या, हव्यास वाढला. गावाचं सुख समाधान पार हिरावून गेलं.वीज आली आणि रॉकेलच्या दिव्यांनी टिमटिमणारं गाव विजेच्या दिव्यांनी झगमगायला लागलं. विजेच्या दिव्यांनी गावातल्या चांदण्याची रम्यता, शितलता, शांती पार विस्कटून गेली. वीजेमुळे खूप साऱ्या सुविधा आल्या पण त्या सोबत चंगळता सुद्धा आली. घरातलं जातं गेलं चक्की आली, पाटा वरवंटा गेला आणि मिक्सर आलं. झिरपणारा मातीच्या गार पाण्याचा माठ गेला आणि फ्रिज आलं. घरोघरी मातीच्या चुली ही म्हण कालबाह्य झाली आणि घरोघरी वीजेच्या/गॅसच्या शेगड्या ही नवीनच म्हण रुजू झाली. धुणं धुवायला गृहिणी नदीवर निसर्गाच्या सान्निध्यात जायच्या तर आता वॉशिंग मशीन आलं. गरजा वाढल्या, हव्यास वाढला. या गरजांंनी, हव्यासानं गावाचं सुख समाधान हिरावून गेलं. आधी खेड्याच्या गरजा सिमीत होत्या. मुळातच गरजा फारशा नसल्याने गरीबीतलं गावही सुखी समाधानी होतं.पूरक मातीच्या धाब्याची घरं हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात थंडगार असत. या घरांमध्ये उन्हाळ्यात ही वीजेच्या पंंख्याशिवाय सुखाची गाढ झोप लागत असे. आता मातीच्या धाब्याच्या घरांच्या जागी आरसीसीची सिमेंटची घरं आली. या घरांमध्ये वीजेच्या पंख्याची हवा सुद्धा उन्हाच्या झळांसारखी गरम भासते. मग नुस्त्या पंख्यावर गरज भागत नाही, तर कुलर पाहिजे, एसी पाहिजे. सुविधा येताहेत पण सुख समाधान दूर पळतयं.गावाच्या भवतीची शेती -बागायती जाऊन त्या जागी वाड्या, वस्त्या, नगरं, कॉलन्या उभ्या राहताहेत. गाव विस्तारतंय आणि रान आकसतयं. गरजपूर्तीसाठी माणूस झापडं लावलेल्या टांग्याच्या घोड्यासारखा धाव धाव धावतोयं. धावता धावताच धाप लागून कोलमडतोयं. झापडं लावलेली असल्याने सभोवतालच्या निसर्गाच्या ºहासाशी, ढासळणाºया मानवी मुल्यांशी त्याला जणू काही काहीच देणं घेणं उरलं नाहीये. जमिनीतून वर्षाकाठी एक पीक घेणारा माणूस आता वर्षाकाठी दोन-दोन कधी तर तीन-तीन पीकं घ्यायला लागला आहे. त्यामुळे भू-गर्भातील पाण्याची पातळी खोल-खोल जातेय. जमिनीतला ओलावा आटत चाललाय. नद्या, नाले, तलावं, धरणं पाण्यावाचून ओस पडताहेत, कधी काळी गावाच्या अर्ध्या अधिक गरजा भागविणारी जीवनदायीनी नदी आजच्या काळात पाण्यावाचून पार केविलवाणी झालीयं. किनाºया लगत नदीच्या पात्रातच माणसं घरं बांधताहेत. गावभरातून जमा झालेला केरकचरा थेट नदीच्या कोरड्या पात्रात आणून टाकला जातोयं. नदीचं पार ‘डम्पिंग ग्राऊंड’ झालयं. कधी काळची जीवनदायीनी नदी आताशा अभागिनी झालीयं.बाहेर लांबून वीजेच्या दिव्यांंनी झगमगतांना दिसणारी गाव आतून मात्र पार कोलमडून पडली आहेत. आरसीसीच्या रंगीत घरात राहणारा, कुलरच्या गार हवेत विसावणारा गाव, चकचकीत डांबरी रस्ते झाले म्हणून मोटार सायकलवरून सुसाट धावणारा गाव, उन्हाळ्यात घोटभर पाण्यासाठी मात्र मैलोनमैल वणवणाताना दिसतो. गावाच्या अभावग्रस्त जगण्याची वणवण अजून तरी थांबलेली दिसत नाही. भौतिक सुविधांच्या आधुुनिक जगण्यात गावाचा मानसिक तोल मात्र पार बिघडून गेलाय, विस्कटून गेलाय, म्हणूनच गाव हळूहळू आत्मघाताच्या दिशेनं वाटचाल करताना दिसतोय.- रवींद्र पांढरे, पहूर (पेठ), ता.जामनेर, जि.जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJamnerजामनेर