शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

घणकचरा प्रकल्प जैसे थे स्थितीत

By admin | Updated: February 9, 2017 00:27 IST

२००४ मध्ये झाली होती सुरुवात : आता नव्याने प्रक्रिया राबविण्याची गरज

भुसावळ : जिल्ह्यात सर्वात मोठी  आणि सुमारे शंभर कोटी रुपयांपेक्षाही जास्त अर्थसंकल्पीय तरतूद असलेल्या  भुसावळ नगरपालिकेचा अतिशय महत्त्वपूर्ण आणि पालिकेच्या आर्थिक  स्थितीत वाढ होणारा महत्त्वाकांक्षी घनकचरा प्रकल्प तब्बल आठ वर्षांपासून जैसे थे स्थितीत असल्याची स्थिती आहे.भुसावळ तालुक्यातील आणि शहरापासून साधारण पंधरा कि. मी. अंतरावरील गोजोरे गावा लगत  भुसावळ नगरपालिकेचा हा घनकचरा प्रकल्प सध्या धूळ खात पडून असल्याचे वास्तव आहे.मधल्या काळात या प्रकल्पाकडे शासन व लोकप्रतिनिधी या पैकी कोणीही ढुंकून पाहिले नाही. त्यामुळे हा प्रकल्प केवळ नावाला असल्याची स्थिती आहे.भुसावळ नगरपालिका ही जिल्हा आणि नाशिक विभागातील सर्वात मोठी व ‘अ’वर्ग नगरपालिका आहे. तिचा अर्थसंकल्पही १०० कोटींचा आहे, असे असताना त्याकाळी महाराष्ट्र शासनाने सूचविलेला घनकचरा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही.नव्याने प्रकल्पाची गरजभुसावळ शहरातून निघणारा हजारो टन कचºयावर प्रक्रिया करुन त्यापासून उपयुक्त असे शेतीसाठीचे खत तयार करण्यासाठी हा घनकचरा प्रकल्प त्याकाळी आकारास येण्यासाठी सुरू करण्यात आला होता. आता त्याची स्थिती पूर्वीसारखीच आहे. त्यामुळे तो नव्याने सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.दरम्यान, मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर म्हणाले प्रकल्पासाठी नव्याने प्रक्रिया राबविण्यात येईल. त्यासाठी सहा महिने लागतील. नवीन एजन्सी नेमावी लागेल. रस्त्यावरील व घराघरांमधील कचरा गोजोरे येथे नेवून त्या ठिकाणी सायंटिफिक ‘डंपिंग ग्राऊंड तयार करण्यात येईल, असे बी.टी.बाविस्कर यांनी सांगितले. तेथे आधीच उभारण्यात आलेल्या फलाटावर रोज एक या प्रमाणे कचºयाचे ४६ ढिग तयार केले जातील. त्यावर प्रक्रिया केली जाईल. फवारणी केली जाईल. पहिल्या दिवशी तयार केलेल्या ढिगाचा कचरा कुजल्यानंतर तो सायंटिफिक जाळीने गाळल्यानंतर त्यातून खत तयार केले जाणार असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)२४ प्रभाग भुसावळ शहरात २४ प्रभाग आहेत. पालिकेत ४८नगरसेवक आहेत. ४८ वॉर्ड आहेत.या सर्व वार्डातून जमा होणारा कचरा गोजोरे येथे नेऊन त्यावर प्रक्रिया करण्यासाठी हा बंद पडलेला पालिकेचा घनकचरा प्रकल्प पुन्हा नव्याने सुरू करण्यावर विद्यमान प्रशासनाने तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे. स्वच्छ महाराष्ट्र भुसावळ पालिका प्रशासन सध्या महाराष्टÑ शासनाचे स्वच्छ अभियान राबवित आहे.अभियानांतर्गत बंद पडलेला प्रकल्प सुरू केला तर शहराची स्वच्छतेकडे वाटचाल होईल.सध्या शहरातील कचरा महमार्गाच्या बाजुला फेकला जातो.सहा महिन्याचा कालावधी घनकचरा प्रकल्प उभारुन कचºयाची विल्हेवाट लावणे हे पालिकेचे कर्तव्य आहे. बंद पडलेला घन कचरा प्रकल्पाची नव्याने उभारणी होईल.त्यासाठी सहा महिने लागतील. नवीन एजन्सी त्यासाठी नेमण्यात येईल.घराघरातील व रस्त्यावरील कचरा वाहून नेऊन गोजोरे येथे घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी सायंटिफिक डंपींग ग्राऊंड तयार करण्यात येईल.मुंबईच्या मक्तेदाराकडे होती जबाबदारी४साधारण २००८ मध्ये भुसावळ पालिकेने गोजोरे येथे घन कचरा प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे पाच हेक्टर जागा खरेदी केली होती. त्यावर हा प्रकल्प उभारण्यासाठी बांधकामदेखील करण्यात आले आहे, मात्र पुढे गती मिळाली नाही, असे मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर म्हणाले.कुठेही कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधी४सध्या भुसावळ शहरातून गोळा होणारा कचरा महामार्ग आणि शहराच्या बाहेर कुठेही टाकला जातो. कचरा टाकण्यासाठी निश्चित अशा डंपिंग ग्राऊंडची व्यवस्था नाही. त्यामुळे कधी खेडी रोडवर. कधी वांजोळा रोडवर तर उड्डाण पुला लगत महामार्गाच्या बाजला कचरा टाकला जातो. त्याचा लोकांना त्रास होतो.काम पूर्ण झालेच नसल्याने नुकसान४गोजोरे येथे घनकचरा उभारण्याचे काम मुंबईच्या मक्तेदाराला दिले. त्याने सुरुवातीला काही काम केले. नंतर ते बंद पडले. त्याकडे तेव्हा लक्ष देण्यात आले नाही. आता हा प्रकल्प सुरू करण्यासाठी विचार केला जाईल, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर यांनी दिली.