आनंद सुरवाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबाअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे २८ लाख लोक मोफत तसेच शासनाकडून मिळणाऱ्या नियमीत धान्याचे लाभार्थी आहेत. यात अनेकांकडे टीव्ही, फ्रीज, गाडी असतानाही ते मोफत धान्याचा लाभ घेत आहेत. यासाठी दर महिन्याला १५ हजार मेट्रीक धान्याची वाटप होत असते, दरम्यान, निकषात बसणाऱ्यांकडून हमी पत्र लिहून घेतले जाते, त्यामुळे निकषात न बसणाऱ्यांना लाभ दिलाच जात नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
अंत्योदय अंतर्गत कुटुंबाला ३५ किलो तर प्राधान्य कुटुंबांतंर्गत प्रत्येक सदस्याला ५ किलो असे धान्य दिले जाते. मध्यंतरी भरड धान्यही दिले जात होते. यात शासनाकडून मोफत धान्यही कोरोनाकाळासाठी वाटप करण्यात येत आहे. अंत्योदयची नोंदणी सध्या लॉक असली तरी प्राधान्य कुटुंबाला निकषानुसार कार्ड दिले जात आहे.
जिल्ह्याची लोकसंख्या -
४७३६७३३
एकूण रेशनकार्डधारक -
१००६६१३
अंत्योदय, पीएचएच कार्डधारक -४७०९५०
कोणत्या तालुक्यात किती कार्डधारक
जळगाव : ६३७५१
जामनेर : ३७६४३
एरंडोल : २०४००
धरणगाव : २२०२८
भुसावळ : ४१७३४
यावल : २९३२७
रावेर : ३८३५४
बोदवड : १०६००
मुक्ताईनगर : १८६८३
पाचोरा : ३५१५०
भडगाव : १८२४४
चाळीसगाव : ४४७५७
अमळनेर : ३५१९९
चोपडा : ३३१२९
पारोळा : २१९५१
दारिद्र्य रेषेखालीसाठीचे निकष काय?
दारिद्रयरेषेखालील कुटुंबांसाठी काही निकष ठरवून देण्यात आले आहेत. त्यानुसार ग्रामीण भागात रहिवास असलेल्या कुटुंबाचे वार्षीक
उत्पन्न हे ४४ हजाराच्या आत असायला हवे.
तर शहरी भागातील रहिवास असलेल्या कुटुंबाचे वार्षीक उत्पन्न हे ५४ हजारांच्या आत असायला हवे.
यानुसार दारिद्ररेषेखालील कुटुंबात त्यांची नोंद होत असते.
प्राधान्य कुटुंबाला कार्ड
अंत्योदय योजनेत नाव समाविष्ट करण्यासाठी ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेचा ठराव लागतो. अंत्योदय शासनाकडूनच लॉक असल्याने
त्याचे काम सुरू झालेले नाही. मात्र, पीएचच अर्थात प्राधान्य कुटुंबाचे काम सुरू आहे. यानुसार उत्पन्न कमी असेल, अर्ज केला असेल,
कागदपत्रे जोडलेली असतील त्यांना कार्ड मिळते.
कारवाई नाही
निकषात बसणाऱ्यांना कार्ड दिले जाते व धान्य दिले जाते, त्यामुळे अद्याप निकषात न बसणाऱ्यांचा यादीत समावेश आहे, अशी काही बाब
निदर्शनास आलेली नसून अशी कारवाई झालेली नाही. जे निकषात बसतात त्यांची चौकशी केली जाते, त्यांच्याकडून हमी पत्र भरून घेतले
जाते,असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी सांगितले.
८८ टक्के लोकांना धान्य
पात्र लाभार्थ्यांपैकी ८८ टक्के लोकांना धान्य वाटप करण्यात आले आहे. जसे धान्य येते तसे तातडीने त्याचे वाटप केले जाते. यात
पीएचएचमध्ये कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ किलो धान्य दिले जाते. अंत्योदय आणि पीएचएच या दोन्हीचे निकष समानच आहेत.
कोट
दरम महिन्याला १५ हजार मेट्रीक टन धान्य वितरीत केले जाते. पीएमजीकेवाय अंतर्गत मोफत तर नियमीतचे धान्य दोन रुपये किलोप्रमाणे मिळत आहे. यात भरड धान्यही आपण देत असतो, ते वाटप पूर्ण झाले आहे. आता पुन्हा ऑगस्ट, सप्टेंबरपासून मका, ज्वारी देण्यात येणार आहे. - सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी