जळगाव : हरिविठ्ठल नगर येथील अनिल लोंढे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या जळगाव शहर कामगार अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी केली. नियुक्तीवेळी प्रताप बनसोडे, किरण अकडमोल, संदीप तायडे, गणेश वाघ, शुभम सदावर्ते, चंद्रकांत हतागडे, संदीप न्याहळदे, दीपक सपकाळे आदींची उपस्थिती होती.
००००००००००००
महाराणा विद्यालयात गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा
जळगाव : महाराणा प्रताप विद्यालयात हरित सेनेतर्फे शाडूच्या मातीपासून गणपती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी मूर्तीकार वैशाली रेवागडे यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. याप्रसंगी मुख्याध्यापक डी.एस.पाटील, डी.बी.सोनवणे, एस.व्ही.पाटील, विष्णू साबळे आदींची उपस्थिती होती.
००००००००००००००
ए.टी.झांबरेमध्ये बैलपोळा साजरा
जळगाव : ए.टी.झांबरे विद्यालयात बैलपोळा साजरा करण्यात आला. कोरोना प्रादुभार्वामुळे सध्या बरेचसे पालक गावी आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी ऑनलाईन बैलपूजन केले. सुरूवातीला मुख्याध्यापक डी.व्ही.चौधरी यांनी शेतक-यांच्या जीवनात बैलांचे कसे महत्त्व आहे, हे विद्यार्थ्यांना स्पष्ट केले. या ऑनलाइन कार्यक्रमात कृष्णा बराटे, शुभम वाणी, विरेन परदेशी, भूमित वाणी, सोनाक्षी पाटील, जिज्ञासा रोटे, भावेश पाटील, दुर्वेश रोटे हे विद्यार्थी आणि त्यांचे पालक सहभागी होते. डी.ए.पाटील, सतिष भोळे, ए.एन.पाटील, इ.पी.पाचपांडे यांनी परिश्रम घेतले.