शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

धनादेशाची रक्कम खात्यावर जमा होईना

By admin | Updated: January 19, 2017 00:11 IST

धरणगाव : कापूस उत्पादनात वाढ, मात्र पैसे मिळण्यास हाल, नोटाबंदीचा परिणाम

धरणगाव : सध्या शेतकºयांची अवस्था ‘देवाने दिले, अन् सरकारने हाल केले’ अशी झाली आहे. पाऊस चांगला झाल्याने कापसासह इतर पिकांचे उत्पादन भरघोस आले. मात्र सरकारने ‘नोटाबंदी’चा निर्णय घेतल्याने व्यापारी व जिनिंग उद्योजक शेतकºयांना धनादेशाने पैसे अदा करीत आहेत. मात्र बँकेत धनादेश जमा केल्यानंतर शेतकºयांच्या खात्यावर १५-१५ दिवस पैसे जमा होत नसल्याने शेतकरी शासन व बँकांवर संताप व्यक्त करीत आहे.यंदा निसर्गाने साथ दिल्याने शेतकºयांना कापूस उत्पादन भरघोस झाले. सरकारने हमी भाव कमी दिले असले तरी जिनिंग उद्योजक, खासगी व्यापारी पाच हजार पाचशेवर प्रती क्विंटलच्या भावात सध्या कापूस खरेदी करीत आहेत. मात्र देवाने भरघोस उत्पन्न दिले असले तरी कापूस विक्रीची रक्कम रोख भेटत नसल्याने शेतकरी नाराजीचा सूर काढत आहेत. हा रोख पैसे मिळाल्याचा आनंद हिरावणाºया सरकारवर शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.माल द्या, अन् धनादेश घ्याकापूस, मका उत्पादक शेतकरी माल विक्री करून व्यापाºयांकडून धनादेश घेत आहेत. रोखीने कोणीही माल खरेदी करीत नसल्याने धनादेश घ्यावे लागत आहेत. हा धनादेश जिल्हा बँकेत, अर्बन बँकेत वा युनियन बँकेत जमा केला गेला तर शेतकºयांच्या खात्यावर १५ दिवसानंतरच रक्कम जमा होत आहे.  शेतकºयांच्या खात्यावर धनादेशाची रक्कम उशिरा का जमा होत आहे, हे कुणीही सांगायला तयार नाही. आॅनलाइनच्या या जगात हेतूपुरस्सर बँकांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.  येथील मोठा माळीवाडा भागातील रहिवासी विनोद गोकूळ माळी यांच्या फोनवर बँक अधिकारी (बनावट) असल्याची माहिती घेऊन सर्व खात्याची चौकशी केली. सरकारी व बँक खात्याच्या कामासाठी त्यांच्या एटीएम कार्डाचे डिजिट नंबर व कोड नंबर विचारून तुमचे अकाऊंट व्हेरिफाय करीत असल्याचे सांगून खात्यातून चार वेळा करून एकूण २८ हजार ९९७ रुपये रक्कम आॅनलाइन काढली.खात्याची माहिती देऊ नये -पाटीलयापूर्वी चार-पाच शेतकºयांच्या अज्ञानाचा फायदा घेत अशी लूट झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याचा तपास लागलेला नाही. असे बोगस फोन करणाºयांना खात्याची माहिती कुणीही देऊ नये, असे आवाहन धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी केले आहे.   (वार्ताहर)मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्टÑीयकृत बँकांमधून  कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. त्यामुळे शेतकºयांनाही आता एटीएम कार्डाचा वापर करावा लागत आहे. ४मात्र या प्रक्रियेत बँक अधिकाºयांच्या नावाचा वापर करून अशिक्षित शेतकºयांचा एटीएम कार्डाचा डिजिट नंबर व कोड नंबर विचारून त्यांच्या खात्यातून आॅनलाइन रक्कम काढण्याचे प्रकार घडले आहेत.