देऊळगाव राजा : शहराजवळील जालना-चिखली बायपासवर ट्रक उलटल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. यात ट्रकखाली येऊन गाईचा मृत्यू झाला आहे.
सांगलीहून वाराणसीकडे जाणारा ट्रक क्रमांक (एम.एच.१०. सीआर. ५५६२) हा ट्रक देऊळगाव राजा शहरातील बायपास मार्गे चिखलीकडे जात होता. अचानक गाय समोर आल्याने गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक उलटला. या अपघातात ट्रकखाली येऊन गाईचा मृत्यू झाला. सुदैवाने ट्रक चालकाचा जीव वाचला असून, ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.