ग्रामपंचायत कार्यालयात प्रशासक प्रेम खिल्लारे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. तसेच सामूहिक संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी शिवाजी चेके, अमोल देशमुख, आबासाहेब वरखडे, शेख रहीम आदींची उपस्थिती होती. प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित कार्यक्रमास डॉ. ए. डब्ल्यू. वाघमारे, डॉ. प्रिया गोरकर व इतरांची उपस्थिती होती.
विवेकानंद इंग्लिश स्कूल व नित्यानंद प्राथमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमास प्राचार्य एस. के. मोटे, मुख्याध्यापक एस. एम. उफाड, बी.ए. हरबक, जी. एम. जाधव, वाय. ए. मोटे, बी.डी.भानुसे, अच्युत वाघमारे, वैजीनाथ आनंदे, महादेव थाबडे, इर्शाद शेख आदींची उपस्थिती होती.
------------------
गुरुदेव इंग्लिश स्कूल भिलपुरी
जालना : तालुक्यातील भिलपुरी येथील गुरुदेव इंग्लिश पब्लिक स्कूलमध्ये भाऊसाहेब गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गुलाबराव गोरे, ज्ञानेश्वर गोरे, नरसिंग गोरे, नरहरी गोरे, नंदकिशोर गोरे, नामदेव गोरे, पुंजाराम गोरे, नागराज गोरे, अशोकराव डिखुळे, मोहन गायकवाड, बालाजी तांगडे, गोविंद गोरे, ग्रामसेवक गिराम, प्राचार्या अनिता गोरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
------------------
जिजामाता विद्यालय, पिरकल्याण
जालना : तालुक्यातील पिरकल्याण येथील जिजामाता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात मनोज कुमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भास्कर पवार, संस्था सचिव सतीश कुमफळे, मुख्याध्यापक नवनाथ पाचरणे, कावले, शेळके, मांटे, मोरे, मिरकर, भोसले, कावले, जोशी, वानखेडे, बिडवे, बाबासाहेब मस्के, अशपाक शेख, नितीन काकडे, आकाश शिंदे आदींची उपस्थिती होती.
------------------
केंद्रीय प्राथमिक शाळा, आव्हाना
आव्हाना : येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत राजकुमार राजपूत यांच्या हस्ते महापुरूषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर केंद्रप्रमुख सांडू नरोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक गुलाबराव ऊजागरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थांची उपस्थिती होती.