ग्लास्गो : वेगवेगळ्या आरोपांखाली अटक करण्यात आलेले आयओएचे (भारतीय ऑलिम्पिक संघटना) महासचिव राजीव मेहता व कुस्ती रेफरी वीरेंद्र मलिक यांची आज पुराव्याअभावी निदरेष मुक्तता करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध असलेले आरोप रद्द करण्यात आले.
भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या अधिका:यांच्या मते, या दोन्ही अधिका:यांवरील आरोप रद्द करण्यात आले. त्यामुळे हे प्रकरण शेरिफ न्यायालयात सुनावणीसाठी आले नाही. या अधिका:यांची निदरेष सुटका झाल्यामुळे भारतीय पथकाने सुटकेचा नि:श्वास सोडता आला.
मेहता यांना दारू पिऊन गाडी चालविल्याप्रकरणी, तर मलिक यांना विनयभंगप्रकरणी अटक करण्यात आली होती. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारतीय पथकासाठी ही लाजीरवाणी बाब ठरली होती. मलिक यांचा भारतीय पथकामध्ये समावेश नव्हता. हे दोन्ही अधिकारी क्रीडाग्राममध्ये नव्हते. हे दोन्ही अधिकारी एका स्थानिक हॉटेलमध्ये होते. उच्चायुक्त कार्यालयाच्या अधिका:यांनी सांगितले, की साक्ष व पुरावे नसल्यामुळे या दोघांवरील आरोप रद्द करण्यात आले. या प्रकरणात एडिनबर्गमध्ये भारतीय उच्चायुक्त कार्यालय पोलिसांच्या संपर्कात होते. न्यायालयात उपस्थित आयओए प्रतिनिधी मंडळामध्ये समावेश असलेले उत्तर प्रदेश ऑलिम्पिक संघटनेचे सचिव आनंदेश्वर पांडे यांनी सांगितले, की प्राथमिक चौकशीनंतर या दोन्ही अधिका:यांची सुटका करण्यात आली. प्राथमिक चौकशीमध्ये स्कॉटलंड यार्ड पोलिसांना आरोप निश्चित करण्यासाठी साक्ष व पुरावे मिळाले नाही. त्यामुळे न्यायालयात सादर न करताच त्यांची सुटका करण्यात आली. मेहता आपल्या मित्रची कार चालवीत होते आणि पार्किगच्या बाहेर पडताना दुर्घटना झाली होती. (वृत्तसंस्था)
मलिक निलंबित
नवी दिल्ली : एब्ल्यूएफआयने (भारतीय कुस्ती महासंघ) रेफरी वीरेंद्र मलिक यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. ग्लास्गोमध्ये रविवारी संपलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान मलिक यांना विनयभंगप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांच्या निदरेष सुटकेनंतर कुस्ती महासंघ पुढे कार्य निर्णय घेईल याकडे क्रीडाक्षेत्रचे लक्ष लागून राहणार आहे.
आमच्या खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेत देशाची मान उंचावली; पण या अधिका:यांमुळे देशाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. सरकारने त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करायला हवी. भविष्यात या अधिका:यांच्या विदेशवारीवर बंदी घालण्यात यावी.
-मिल्खा सिंग