शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
3
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
4
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
5
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
6
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
8
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
9
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
10
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
11
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
12
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
13
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
14
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
15
३ फ्लॅट, ५० लाखांचं सोनं... महिलेने १०० लोकांची केली ९ कोटींची फसवणूक, 'असा' घातला गंडा
16
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
17
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
18
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
19
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
20
कोळशावरील बेकऱ्यांना टाळेच! नोटिसा देण्यास सुरुवात; स्वच्छ इंधनच वापरावे लागणार

अमेरिकेत एकट्याच्या प्रवासासाठी येते आहे ‘उडती मोटार!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2017 01:10 IST

अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमधील ‘किट्टी हॉक’ या एका स्टार्ट-अप कंपनीने एकटा माणूस प्रवास करू शकेल असे उडणारे वाहन तयार केले असून

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमधील ‘किट्टी हॉक’ या एका स्टार्ट-अप कंपनीने एकटा माणूस प्रवास करू शकेल असे उडणारे वाहन तयार केले असून या ‘फ्लार्इंग मशिन’ची विक्री याच वर्षांच्या उत्तरार्धात सुरु करण्याची कंपनीची योजना आहे.‘गूगल’ या कंपनीचे मुख्यालय असलेल्या कॅलिफोर्नियामधील माऊंटन व्ह्यू शहरातच ही ‘किट्टी हॉक’ कंपनी असून ‘गूगल’चे सह-संस्थापक लॅरी पेग यांनीही या स्टार्ट-अपमध्ये पैसा गुंतविला असल्याचे बोलले जाते.कंपनीने या उडत्या वाहनास ‘पर्सनल फ्लार्इंग मशिन’ असे म्हटले असून त्याचे एक प्रायोगिक मॉडेल (प्रोटोटाइप) हवेत उडत असतानाचा व्हिडिओही जारी केला आहे.या भावी उडत्या वाहनाची माहिती देताना ‘किट्टी हॉक’ कंपनीने त्यांच्या वेबसाइटवर म्हटले की, आमचे हे उडते यंत्र पूर्णपणे विजेवर चालणारे, सुरक्षित आणि चाचण्यांमध्ये खरे उतरलेले आहे. विनागजबजलेल्या भागांमध्ये उडण्यासाठी अतिहलके विमान म्हणून ते अमेरिकेच्या नागरी विमान वाहतूक प्रशासनाच्या नियमांत बसते. ते चालविण्यासाठी वैमानिक परवाना घेण्याची गरज नाही. दोन तासांच्या प्रशिक्षणानंतर कोणीही ‘हे फ्लार्इंग मशिन’ चालवू शकेल.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या वाहनाला फिरणारे आठ पंखे आहेत. त्याचे वडन सुमारे १०० किलो (२२० पौंड) असून ते जमिनीपासून १५ फूट उंचीवरून ताशी २५ मैल (४० किमी) वेगाने उडू शकते. हे उडते वाहन या वर्षाच्या अखेरपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल, असे नमूद करून कंपनीने इच्छुक ग्राहकांची प्रतिक्षायादी तयार करण्यासाठी प्रत्येकी १०० डॉलर भरून सदस्यनोंदणी योजनाही जाहीर केली आहे. प्रतिक्षायादीवरील ग्राहकांना सवलतीच्या किंमतीत हे ‘फ्लार्इंग मशिन’ दिले जाईल. मात्र त्याची किंमत अद्याप ठरलेली नाही. स्टॅनफर्ड विद्यापीठातील संगणक विज्ञानाचे प्राध्यापक सेबेस्टियन थ्रुन हे ‘किट्टी हॉक’ स्टार्ट-अपचे अध्यक्ष आहेत. ‘गूगल’ची स्वचालित मोटारीची योजनाही त्यांचीच होती. आमचे ‘फ्लार्इंग मशिन’ व्यक्तिगत प्रवासाचे भवितव्य आमूलाग्र बदलून टाकेल’, असे त्यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. कॅमेरून रॉबर्टसन आणि टॉड रीचर्ट हे या नवकल्पनेमागचे मुख्य अभियंते आहेत. जणू उडती मोटारसायकललेखकसिमेरॉन मॉरिसे यांनी या ‘फ्लार्इंग मशिन’चे चाचणी उड्डाण करून पाहिल्यानंतर आपला अनुभव एका ब्लॉहमधये लिहिला. ते म्हणतात, हे ‘प्रोटोटाइप म्हणजे जणू उडती मोटारसायकलच आहे. बाईकवर जसे तुम्ही थोडेसे पुढे झुकून सीटवर बसता तसेच यावरही बसावे लागते. मला माझे हवेत उडण्याचे स्वप्न साकार झाल्यासारखे वाटले.