शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

ही व्यक्ती तुम्हाला माहिती आहे का? अमेरिकेत समलैंगिक व्यक्तींची चळवळ उभी करणारे हार्वे मिल्क

By अोंकार करंबेळकर | Updated: September 6, 2018 14:07 IST

जगभरात आज जेथे समलैंगिक संबंध कायदेशीर आहेत तेथेही असाच लढा कार्यकर्त्यांना द्यावा लागला होता. अमेरिकेतील समलैंगिकांसाठी हार्वे मिल्क यांनी आपले आयुष्य वेचले होते. त्यांची कहाणी प्रत्येक सजग व संवेदनशिल नागरिकास माहिती असलीच पाहिजे.

मुंबई- ब्रिटिशांची भारतात सत्ता असल्यापासून अस्तित्वात असणारा 377 नियम आज रद्दबातल ठरवण्यात आला. गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर सर्वोच्च न्यायालयात समलैंगिक नागरिकांना आपले अधिकार मिळाले आहेत. जगभरात आज जेथे समलैंगिक संबंध कायदेशीर आहेत तेथेही असाच लढा कार्यकर्त्यांना द्यावा लागला होता. अमेरिकेतील समलैंगिकांसाठी हार्वे मिल्क यांनी आपले आयुष्य वेचले होते. त्यांची कहाणी प्रत्येक सजग व संवेदनशिल नागरिकास माहिती असलीच पाहिजे.गेल्या चाळीस वर्षांमध्ये अमेरिकेमध्ये सामाजीक विषयांवरती वैचारिक मंथन झाले. दुसऱ्या महायुद्धनंतर अमेरिकन समाज आपल्यातील एकेक घटकावरती, विषयावरती विचार करु लागला होता. स्त्रीयांचे प्रश्न किंवा वाशिंक भेदाभेद याकडेही नव्या विचारातून पाहिले जाऊ लागले.   तेथील नागरिकांनी आपले प्रश्न सोडविण्यासाठी सामाजीक मंथनाबरोबर राजकीय आधारही घेतला. सत्तरच्या दशकामध्ये गे- लेस्बियन व्यक्तीचे विषय चर्चेमध्ये आणि राजकीय पटलावरतीही येऊ लागले आणि तेथूनच त्यांच्या प्रश्नावर विचार सुरु झाला. याच चळवळीमध्ये एका व्यक्तीचे नाव आदराने घेतले जाते ते म्हणजे हार्वे मिल्कचे. १९३० साली न्यू यॉर्कमध्ये एका लिथुआनियन ज्यू कुटुंबात जन्मलेल्या मिल्कचे सुरुवातीचे सामाजीक-आर्थिक आ़युष्य चारचौघांप्रमाणेच होते. शिक्षण संपल्यावर त्याने अमेरिकन नौदलातर्फे कोरियन युद्धात सहभागही घेतला. त्यानंतर त्याने इन्शुरन्स सल्लागार वगैरे विविध व्यवसायही केले. पण त्याला स्वत:बद्दल एका नव्या गोष्टीची जाणिव वयाच्या सोळाव्या वर्षीच झाली होती. आपण समलैंगिक आहोत आणि आपल्याला मुले आवडतात हे त्याला समजले होते. व वैयक्तिक आ़युष्यात त्याची काही मुलांशी अशा नातीही तयार झाली. पण सार्वजनिक आयुष्यात त्याने याचा कधीही उच्चार केला नाही. १९७० च्या दरम्यान त्याने सॅनफ्रॅन्सिस्कोला राहण्याचा निर्णय घेतला. दुसºया महायुद्धानंतर सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये समलैंगिक व्यक्ती स्थायिक होण्यास सुरुवात झाली होती. लष्करातून बाहेर पडल्यावर कित्येक समलैंगिक व्यक्तींनी आपल्या राज्यात जाण्याऐवजी येथे राहण्याचा निर्णय घेतला होता. मिल्कलाही सॅन फ्रॅन्सिसिको आवडले व त्याने तेथील कॅस्ट्रो रस्त्यावर कॅमेरा स्टुडिओ सुरु केला. शहरातील वाढत्या समलैंगिकांच्या संख्येकडे राजकीय  नेत्यांचेही लक्ष होतेच. 

मिल्कने १९७३च्या सुमारास शहरातील विविध समस्या आणि समलैंगिकांच्या प्रश्नावरती लक्ष द्यायला सुरुवात केली. समलैंगिकांना होणारा त्रास, गे-बार्सवर पडणारे छापे, त्यातून गे-पोलीस असा होणारा संघर्ष नेहमीचाचा झाला होता. याच पार्श्वभूमीवर मिल्कने राजकारणामध्ये प्रवेश केला आणि कॅस्ट्रो डिस्ट्रिक्ट विभागातून सुपरवायझर पदासाठी अर्ज केला. अल्प तयारी आणि केवळ भाषणांच्या मदतीने निवडणुकीत उतरलेल्या मिल्कला पहिल्याच प्रयत्नामध्ये १६,९०० मते मिळाली मात्र ३२ उमेदवारांमध्ये त्याला दहावे स्थान मिळाले. पराभव मान्य करुन मिल्कने पुन्हा समलैंगिकांच्या समस्यांकडे लक्ष वळविले. त्याने व इतर गे उद्योजकांनी मिळून युरेका व्हॅली मर्चंटस असोसिएशन नावाने संघटना स्थापन केली व मिल्क त्याचा अध्यक्ष झाला. समलैंगिकांनी समलैंगिकांच्या दुकानातून खरेदी करावी असे तो आग्रहाने सांगत असे. त्यानंतर १९७४ साली कॅस्ट्रो स्ट्रीट फेअरही त्याने आयोजित केला. असा एकेक टप्प्याने त्याचा सामाजीक व राजकारणातील प्रवास चालूच होता.१९७५मध्ये निवडणुकीत आणखी एकदा अपयश आल्यानंतर अखेर १९७७ मध्ये त्याला सुपरवायझरपद मिळविण्यात यश मिळाले. ९ जानेवारीपासून त्याचा सुपरवायझर म्हणून सिटी कौन्सील म्हणून कार्यकाळ सुरु झाला. सुपरवायझर होताच त्याने विविध कामांची जोरदार सुरुवात केली. अल्प अशा त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याने समलैंगिकांच्याविरोधातील भेदभावाला विरोध करणारे विधेयक मंजूर करुन घेतले. त्याचप्रमाणे कॅस्ट्रो डिस्ट्रिक्टवरील विविध समस्या सोडविण्याचा त्याने प्रयत्न केला. अल्पावधीतच तो नावारुपाला आणि चर्चेत येऊ लागला.१९७८मध्येच सॅन फ्रॅन्सिस्कोला समलैंगिकांचा प्रचंड मोठा प्राईड मार्चही  भरविण्यात अला. साडेतीनलाखापर्यंत लोक यामध्ये सहभागी झाले होते. याच समुदायासमोर मिल्कने त्याचे प्रसिद्ध होप स्पीच नावाने ओळखले जाणारे भाषण दिले. ''आपण सर्व पुराण कल्पना, असत्य आणि विकृत कुरुपतेविरोधात लढण्यासाठी एकत्र आलो आहोत. कोषामध्ये लपून राहिलो तर आपल्याला कधीच अधिकार मिळणार नाहीत'' असे तो सांगत असे. मात्र आता कोठे प्रलंबित कामे मार्गी लागत असतानाच हा प्रवास अचानक थांबला. मिल्क आणि शहराचे महापौर मोस्कोन यांची मानसिक संतुलन ढळलेल्या डॅन व्हाईट या माजी सुपरवायझरने अगदी जवळून गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेने संपुर्ण शहराला धक्का बसला. २००९ साली त्याच्या जीवनावर आधारीत मिल्क हा सुप्रसिद्ध चित्रपट जगभरात सर्वत्र गाजला. अमेरिकेच्या राजकारणात सुरु झालेल्या नव्या मतप्रवाहाचे मिल्कच्या हत्येमुळे नुकसान झाले मात्र त्याच्यामुळे नवा खुला नवा विचार सर्व अमेरिकेच्या समोर आला हे निश्चित. 

टॅग्स :LGBTएलजीबीटीUSअमेरिका