शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील नर्सरी, केजीच्या २२ हजार मुलांचे पुढील वर्षही घरातच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:33 IST

हिंगोली जिल्ह्यातच नव्हे, तर जगभर कोरोनाचा कहर वाढल्याने शैक्षणिकदृष्ट्या मोठे नुकसान झाले आहे. त्यात दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या तर ...

हिंगोली जिल्ह्यातच नव्हे, तर जगभर कोरोनाचा कहर वाढल्याने शैक्षणिकदृष्ट्या मोठे नुकसान झाले आहे. त्यात दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या तर बारावीच्या परीक्षांचे भिजत घोंगडे कायम आहे. मागील वर्षभरात नर्सरीच्या मुलांना तर बडबडगीत अथवा पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडेही मिळाले नाही. ग्रामीण भागातील अंगणवाड्याही बंद आहेत. मोठ्या इंग्रजी शाळांत एकीकडे मोठे शुल्क भरूनही केजी १ व २ च्या विद्यार्थ्यांना वर्षभर शाळेत जाता आले नाही. या वर्गातील मुलांना ऑनलाइन शिक्षण देणेही तेवढेच अवघड होते. मात्र, त्यातही काही ठिकाणी प्रयोग झाले. ते कितपत यशस्वी ठरले हे आगामी काळातच कळणार आहे. मात्र, तूर्त तरी हे वर्ग म्हणजे सोपस्कारच होते, असे चित्र आहे. आता तिसरी लाट येण्याची भीती आहे. या लाटेत तर लहान मुलांनाच जास्त धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचा परिणाम म्हणून तयारी सुरू झाली आहे. प्रशासन लहान मुलांच्या आरोग्यासाठी यंत्रणा उभी करत आहे. त्यामुळे शाळा सुरू करून संक्रमणवाढीचा धोका पत्करला जाण्याची शक्यता कमीच आहे.

जिल्ह्यातील नर्सरी टू केजीच्या शाळा १०८९

२०१८-१९

विद्यार्थीसंख्या २२११२

२०१९-२०

विद्यार्थीसंख्या २३१८५

२०२०-२१

विद्यार्थीसंख्या २२८५२

मुलांच्या मानसिकतेवरही परिणाम, ही घ्या काळजी

मुलांना शाळेची ओळखच ऑनलाइनमुळे होत नसल्याचे दिसत आहे. त्यातच सतत घरी राहूनच अभ्यास करावा लागत आहे. त्यामुळे माेबाईलचा अनावश्यक वापरही वाढू शकतो. त्यामुळे पालकांनीही स्वत:हून त्यांना अभ्यास व वेगळे राहून खेळता येणाऱ्या खेळात गुंतविले पाहिजे.

-देवीदास गुंजकर

वर्षभर कुलूप; यंदा?

मागच्या वर्षी ऑनलाईन नियोजन करून नर्सरी ते केजीच्या विद्यार्थ्यांचा वर्ग घेतला. त्यांना थेट शिक्षक शिकवितात. यात पालकांना थोडा त्रास होतो. त्यांची परीक्षाही घेतली. यंदाही परिस्थिती अवघड आहे. त्यामुळे ऑनलाइन घेण्याचे नियोजन करावे लागेल. शाळेची अनुभूती मिळावी, अशी काळजी घेतली.

-गजेंद्र बियाणी, संस्थाचालक

सरत्या वर्षातही ऑनलाइन वर्ग चालवूनच नर्सरी ते केजीच्या मुलांनाही शिक्षण दिले. त्यात अडचणी आल्या. मात्र, पालकांना सूचना देत अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला. यंदाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ऑनलाइनच शिक्षण द्यावे लागेल, असे दिसते.

दिलीप चव्हाण, संस्थाचालक

गेल्या र्षी नर्सरीपासून ते सर्वच वर्गाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण द्यावे लागले. यंदाही तीच परिस्थिती उद्भवू नये, यासाठी केंद्र सरकारने विद्यार्थ्यांचे लसीकरण करून ही वेळ येणार नाही. याची काळजी घ्यावी. हा एकमेव उपायच सध्या तरी दिसत आहे.

दिलीप बांगर, संस्थाचालक

पालकही परेशान

कृतीयुक्त, मनोरंजक शिक्षणाची केवळ औपचारिकता ऑनलाइनमधून पूर्ण होते. प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष जात नाही. त्यामुळे मुलांना न्यूनगंड निर्माण होण्याची भीती आहे.

उमेश कुटे, पालक

नर्सरी ते केजीची मुले लहान असतात. त्यांना प्रत्यक्ष शिक्षणाचीच गरज आहे. मात्र, नाईलाजाने ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. त्यावरही लक्ष ठेवावे लागते.

देवदत्त देशपांडे, पालक

शाळेत गेल्यावर शिक्षकांसमोर गांभीर्य असते. ऑनलाइनमध्ये ते गांभीर्य उरत नाही. परीक्षाही ऑनलाइनमुळे मुलांची खरी गुणवत्ता कळत नाही.

-श्रीपाद गारुडी, पालक