शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्हा रुग्णालयात रजांसाठी स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:25 IST

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा ढेपाळलेला कारभार सुधारण्याचे नाव नाही. काही ठराविक डॉक्टरांच्या तापामुळे की काय येथे शल्यचिकित्सकांचा रक्तदाबच वाढत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. पूर्णवेळची ही समस्या असताना आता प्रभारींवरही तीच वेळ येत आहे.

ठळक मुद्देअतिरिक्त पदभार सर्वांनाच वाटतोय ओझे, डॉक्टरच पडू लागले आजारी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा ढेपाळलेला कारभार सुधारण्याचे नाव नाही. काही ठराविक डॉक्टरांच्या तापामुळे की काय येथे शल्यचिकित्सकांचा रक्तदाबच वाढत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. पूर्णवेळची ही समस्या असताना आता प्रभारींवरही तीच वेळ येत आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयाचे बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. १00 खाटांच्या रुग्णालयावर तीनशे खाटांचा ताण आहे. कालचाच विचार केला तर २२0 रुग्ण दाखल झाले होते. १00 खाटांची क्षमता असलेल्या रुग्णालयात त्यांना कसे सामावून घ्यायचे, हा डॉक्टरांसमोरचा प्रश्न आहे. काही वरिष्ठ डॉक्टर वेळेवर न येणे, मधूनच सेवा सोडून गायब होणे असे प्रकार करीत आहेत. तर आर्थिक कारभार तर पार ढेपाळले आहेत. प्रशासकीय बाजू अतिशय लंगडी असल्याने काही दिवसांनंतर या रुग्णालयाचा कारभार ठप्पच होतो की काय, अशी भीती आहे. अनेकांची देयके वर्षानुवर्षे रखडत आहेत. तर आर्थिक व्यवहारांच्या भीतीने डॉक्टर मंडळी या जिल्हा शल्यचिकित्सकांचा पदभार स्वीकारायला तयार नाहीत. त्याचा परिणाम म्हणून डॉ.आकाश कुलकर्णी हे आधी हृदयविकार व रक्तदाबाच्या त्रासामुळे रजेवर होते. आता ते वारंवार वाढीव रजा देत असल्याचा प्रकार घडत आहे. त्यांचा पदभार डॉ.मंगेश टेहरे यांना दिला. तेही काल रक्तदाब व इतर त्रासामुळे नांदेडच्या रुग्णालयात दाखल झाल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. त्यांच्याकडेही अतिरिक्त पदभारच होता. आता जिल्हा शल्य चिकीत्सकांसह टेहरे यांचाही अतिरिक्तचा पदभार कुणाकडे द्यायचा हा पेच निर्माण झाला आहे. आरोग्य उपसंचालकांनी तीन ते चार डॉक्टरांना यासाठी आदेशित करून पाहिले. मात्र प्रत्येकाने कारणे पुढे करून यातून अंग काढून घेतले.प्रशासकीय कामकाजाबाबत वारंवार ओरड होत असली तरीही त्यावर योग्य नियंत्रण ठेवणारा अधिकारीच जिल्हा रुग्णालयाला लाभत नाही. प्रशासकीय अधिकारीही वारंवार रजा वाढवून घेत आहेत. सुतवणे नामक लिपिकाने तर घोटाळाच करून ठेवल्याने गुन्हाही दाखल झाला आहे. आता आॅक्सिजन सिलिंडरचा पुरवठा, पॅथॉलॉजी प्रयोगशाळा, स्वच्छता, बाह्यसेवा देणारे डॉक्टर आदी अनेकांची देयके रखडली आहेत. त्यासाठी निधी नाही की अधिकाºयांनाच प्रशासकीय ज्ञान नाही, हे कळायला मार्ग नाही. मात्र भीतीपोटीच ही देयके काढली जात नाहीत. तर हा कारभार कुणी हातीही घ्यायला तयार नाही. प्रशासकीय नियंत्रण नसल्याने डॉक्टर व कर्मचा-यांची मनमानी वाढत चालली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या नियंत्रण ठेवणा-यांच्याच रजा वाढू लागल्याने काही ठराविक लोकांच्या भरवशावरच कारभार चालू आहे. तेही किती दिवस ते सुरळीत ठेवतील, हा प्रश्न आहे. यात लोकप्रतिनिधींनीही लक्ष घालणे तितकेच महत्त्वाचे असून तेव्हाच नांदेड रेफरिंग थांबणार आहे.आमदारांची भेट : असुविधेबद्दल संतापजिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वाढत्या तक्रारींसह कधीकाळी या रुग्णालयात सेवा बजावलेले आ.डॉ.संतोष टारफे यांनाही तेथील दूरध्वनी बंद असल्याने व वरिष्ठ डॉक्टर प्रतिसाद देत नसल्याने रुग्णालयात जाऊन संताप व्यक्त करावा लागला. अतिजोखमीचे रुग्ण हाताळताना डॉक्टरांनी काळजी घेतली पाहिजे. मी स्वत:डॉक्टर असल्याने असा अनुभव येता कामा नये. प्रसंगी अडचणच असेल तर रुग्णालयात येऊन सेवा करण्याची तयारी आहे. मात्र समस्या सांगितल्या पाहिजेत. प्रशासकीय अडचणींचा तिढा सोडविण्यासाठी जिल्हाधिका-यांची भेट घेऊ, असे आ.टारफे म्हणाले.